लॉयनेस क्लबच्या वतीने १११ दिवे लावून राममंदिर भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा

लॉयनेस क्लबच्या वतीने १११ दिवे लावून राममंदिर भूमीपूजनाचा आनंदोत्सव साजरा


उदगीर : लायनेस क्लब उदगीर च्या वतीने आज दि.05 /08/2020 रोजी श्री राम मंदिर,उदगीर येथे 111 दिवे लावुन व प्रसाद वाटप करून राममंदिर भुमिपुजन समारंभाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी पोलिस कर्मचारी व नागरीकांना तुळस,नीम व गुळवेल (गिलोय) च्या 51 रोपांचे वाटप केले. लायनेस सहसचिव व पतंजली योग समितीच्या उदगीर तालुकाध्यक्षा लाय मिनाक्षी स्वामी यांनी उपस्थितांना गुळवेल ( गिलोय )चे आरोग्यविषयक महत्व व कोरोनाशी लढण्यासाठी गुळवेल कसे फायदेशीर आहे हे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.


यावळी लायनेस क्लब उदगीर च्या अध्यक्षा सौ चंद्रकला बिरादार,सचिव सुनिता पंडित, शोभा कोटलवार, अनिता नेमताबादे, सुषमा मुळे, मिनाक्षी स्वामी, स्नेहल बेलुरे, ऋतुजा पंडित यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज