कोविड रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र वार्ड निर्माण करा: भाजपा महिला आघाडीची मागणी

कोविड रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र वार्ड निर्माण करा: भाजपा महिला आघाडीची मागणी


उदगीर : महाराष्ट्रात कोरोना महामारी वाढत असतानाच महिलावरील अत्याचार वाढत आहेत अशा परिस्थितीत उदगीरच्या कोविड रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करावा अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.


महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दुसरीकडे महिलावरील अत्याचार वाढत चालले आहेत. त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या स्थितीमध्ये उदगीर येथील कोविड रुग्णालयात महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करावेत शिवाय महिलांच्या वॉर्डात सुरक्षिततेच्या दृष्टीने महिला कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली आहे. 


या निवेदनावर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या उत्तरा कलबुर्गे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या सरोजा वारकरे, जिल्हा सरचिटणीस श्यामला कारामुंगे, मधुमती कनशेट्टे, शन्नो शेख, उषा माने, अनिता बिरादार, कांताबाई सुर्यवंशी, दीपा कोंगे, अक्कमहादेवी पाटील, मंदाकिनी जीवने, स्वाती वत्तमवार, जया काबरा, रमाबाई वाघमारे, वर्षा धावारे, शशिकला पाटील, बबिता पांढरे, जयश्री टिळेकर, अरूणा बेळकोने, अन्नपूर्णा पंदिलवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज