मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
सकल मराठा समाजाचे माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन
निलंगा: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागण्यासाठी सकळ मराठा समाजाच्या वतीने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून ओबीसीचे आरक्षण वाढवावे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरक्षण अबाधित ठेवावे, मराठा समाजातील ज्यांना नोकरीवर नियुक्त्या मिळालेल्या आहेत त्यांना संरक्षण द्यावे, आरक्षणाचा निकाल येईपर्यंत कुठलीही नोकर भरती करू नये, सारथी संस्थेला भरीव निधी देऊन सक्षम करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरीव निधी द्यावा, मराठा समाजातील मुलांसाठी तात्काळ वस्तीग्रह सुरू करावीत अशा अनेक मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या घरासमोर घंटानाद आंदोलन आयोजित करण्यात आले होते. निलंगा चे आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर हे आंदोलन रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. या आंदोलनात जि. प.सदस्य बजरंग जाधव,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम. एम. जाधव, डॉ. लालासाहेब देशमुख, डॉ. उद्धव जाधव, प्रा. सतीश हाणेगावे, जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके, रामदास सोमवंशी, विजय धुमाळ, राजकुमार बरमदे, विनोद सोनवणे, डी. एन. बरमदे, गणेश गायकवाड,आनंद जाधव, सुनील टोम्पे, कुलदीप सूर्यवंशी, तुषार माकणे, सचिन नाईकवाडे, अंकुश धानोरे, सुबोध गाडीवान, महेश जाधव, बबन राजे, अजित लोभे, प्रताप सोमवंशी, प्रदीप जाधव, माधव गाडीवान, दत्तात्रय बाबळसुरे,शुभम पाटील, शाहूंराज पाटील, उत्तम शेळके, ईश्वर पाटील, अर्चना जाधव, राजश्री शिंदे यांच्यासह मराठा सेवा संघ,मराठा क्रांती मोर्चा, जिजाऊ ब्रिगेड चे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान आंदोलकांची भेट घेऊन माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वात पुढे राहू असे आश्वासन देत राज्य सरकारची इच्छाशक्ती असल्यास आरक्षण निश्चित मिळेल मात्र या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका नसल्याने अडचणी येत असल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आपण शेवटपर्यंत संघर्ष करू अशी ग्वाहीही दिली.
या मोर्चात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनीही भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा हा कोणत्या जाती व पक्षाच्या विरोधात नसून, मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आहे. या समाजातील आरक्षणाच्या संदर्भातील ज्या काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करून समाजाला आरक्षण मिळावे ही आपली भूमिका आहे. मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण या आंदोलनात कायम सहभागी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनात उत्कर्षा बिरादार,भाग्यश्री बिरादार, माधुरी जाधव यांनी मराठा समाजाच्या व्यथा आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना सुपूर्द केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा