मराठवाडा मुक्तीदिनाचे निमित्त: स्वराज फाउंडेशनचा पुढाकार : निलंगा येथे रक्तदान शिबिरात 105 जणांचे रक्तदान

मराठवाडा मुक्तीदिनाचे निमित्त: स्वराज फाउंडेशनचा पुढाकार


निलंगा येथे रक्तदान शिबिरात 105 जणांचे रक्तदान


कोरोनाच्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने निलंगा येथील स्वराज फाउंडेशन व देशमुख हॉस्पिटलच्या वतीने मराठवाडा मुक्तीदिनाचे निमित्त साधून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 151 जणांनी रक्तदान केले.


शहरातील हुतात्मा स्मारकात पार पडलेल्या या शिबिराचे माधव धुमाळ, अजिंक्य पळसे, शिवाजी मोरे, पद्माकर पाटील, दिनेश शर्मा यांच्या रक्तदानाने प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, मुख्याध्यापक दत्ता शाहीर, प्रा. दयानंद चोपणे, डॉ. लालासाहेब देशमुख, जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके, सुनील टोंपे, गणेश गायकवाड, गणेश शाहीर, उत्तम शेळके यांची उपस्थिती होती.


रक्तसंकलनासाठी भालचंद्र रक्तपेढीचे डॉ. योगेश गवसाने, दिगंबर पवार, संतोष पाटील, मुजीब सौदागर, अरुण कासले, गायत्री इगवे, पूजा शिंदे, संजय ठाकूर, महेबूब मुल्ला, अन्सार शेख यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या
Popular posts
लॉयनेस क्लब गोल्ड च्या अध्यक्षपदी सौ. संगीता नेत्रगावे पाटील यांची निवड.*
इमेज
महमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ५१ जनांचे रक्तदान.    मुव्हमेंट फॉर पीस ॲण्ड जस्टीस चा उपक्रम.  
इमेज
प्रभाग 8 मध्ये निर्जंतुकिकरणाची फवारणी उदगीर:
इमेज
मराठी राजभाषा दिनानिमित्त उदयगिरीत 28 फेब्रुवारीला ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकरांचे व्याख्यान
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज