आंतरभारती च्या वतीने राष्ट्रीय बालआनंदमहोत्सवाचे आयोजन
पुणे(प्रतिनिधी)
आंतरभारती व राष्ट्रीय युवा योजना दिल्ली च्या वतीने राष्ट्रीय बालआनंदमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२ आॕक्टोबर ते ३० आॕक्टोबर या कालावधीत हा आॕनलाईन बालआनंदमहोत्सव होणार आहे.या बालआनंदामहोत्सवात ८ते १२ व १३ ते १६ या दोन गटात बालक सहभागी होणार आहेत. फॕन्सीड्रेस, योगा,मुर्तीकला,गीतगायन,कठपुतली,नृत्यवादन,चित्रकला,हस्तकला,ओरीगामी,बुनाईकला या प्रकारात सहभागींनी सहभाग नोंदवायचा आहे.नियोजित कालावधीत दररोज सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत आंतरभारतीच्या फेसबुकपेजवर व युट्युब चॕनलवरून या कलांचे प्रसारण होणार असल्याचे आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य,सचिव अमर हबीब,राष्ट्रीय युवा योजना दिल्ली चे अध्यक्ष डॉ .एस.एन.सुब्बराव ,नरेंद्रभाई वडगावकर यांनी सांगितले . कार्यक्रमासाठी सहभागी बालक व पालकांनी संयोजन समितीचे अध्यक्ष आर.पी.माने,(94214514140) सदस्य,गोविंदा दलाई (ओरिसा 918457802208) एन.सुहास (9921016373)डॉ .विश्वनाथ उतकर,(9404477530)धनंजय गुडसूरकर(9420216398) ,सचिन दुर्गडे(9970063273)प्रमोद शातलावार 8806221415,(8806221415) प्रविण पवित्रकार 9823062254 , हर्षदभाई रावळ (गुजराथ 9512393846 ) गणेश कदम (8668697827) व सौ.प्राची माने यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ .डी.एस.कोरे यांनी केले आहे. ज्यांना या बालआनंदमहोत्सवात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी https://forms.gleR5H5ZUwHVWFPJtbd8 ही लिंक भरून नावनोंदणी करावी असे संयोजकांनी कळविले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा