मंत्रीपदाला शोभेल अशा कामांचे उद्घाटन करा
राज्यमंत्री बनसोडे यांना माजी आ. भालेराव यांचा सल्ला
उदगीर: या मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा तब्बल ३० वर्षानंतर उदगीर मतदार संघाला मंत्रीपद मिळून राज्यमंत्रीपदी विराजमान झालेले नामदार संजय बनसोडे यांनी आपल्या मंत्रीपदाला शोभेल असेच विकास कामांचे उद्घाटन करावे असा सल्ला माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी दिला आहे.
गटारी, सिमेंट रस्ता अशा कामांचे उद्घाटन त्यांनी न करता दर्जेदार कामांचे उद्घाटन करावे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली असलेल्या उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन महाविकास आघाडीचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी रविवारी केले. जी कामे गावपातळीवरील सरपंच करतात, शहरातील नगरसेवक करतात अश्या कामांचे उद्घाटन न करता आपल्या पदाला शोभेल असे दर्जेदार विकास कामांचे उद्घाटन करावे म्हणजे आपले मंत्रीपद सार्थक झाले हे मतदारांना माहित होईल असे माजी आ. भालेराव म्हणाले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा