अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन तहसीलदार  मुंडे यांनी केली पाहणी 

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन तहसीलदार  मुंडे यांनी केली पाहणी


उदगीर: या तालुक्यातील हेर मंडळ मधिल हेर ,बामाजीची वाडी,कुमठा, करडखेल, लोहारा या गावास भेट देऊन अतिवृष्टी पर्जन्यमान झाल्यामुळे पीक नुकसान अनुषंगाने प्राथमिक पाहणी व्यंकटेश मुंडे तहसीलदार उदगीर यांनी प्रत्यक्ष वेगवेगळ्या गांवात अनेक  ठिकाणी शेतांना भेट देऊन केली. कृषीसहाय्यक , तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांनी विविध नुकसानीचा अहवाल सादर करण्याची सुचना दिली. मंडळातील शेतकरी यांच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनी प्रतिनिधि , तसेच तालुका कृषीअधिकारी यांच्या कडे अर्ज करावेत. असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.


यावेळी मंडळ अधिकारी पंडित  जाधव ,तलाठी बालाजी केंद्रे ,कृषी सहाय्यक हाळणीकर, ग्रामविकास अधिकारी बाबुराव मुसळे , लिपिक विलास कांबळे, प्रभाकर सुर्यवंशी, शेतकरी शिवाजी व्यंकट केंद्रे, माधव भुसारे, सुशेन फड ,गजराबाई सुर्यवंशी ,बंदिल सुर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज