उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने २ आॅक्टोंबर २०२० रोजी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने रक्तदान दिनानिमित्य शुक्रवार दि.२ आॅक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव उदगीर शहर व परिसरात दिवसे दिवस वाढत असुन उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात वाढत आहेत त्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे परंतू ब्लड बॅंकेत मागणी ज्यास्त पुरवठा कमी असल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने रक्ताची गरज लक्षात घेऊन ऐच्छीक रक्तदान दिनानिमितत्य शुक्रवार दिनांक २ आॅक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता नगर परिषद व्यापारी संकुल समोरिल प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी उदगीर शहर व परिसरातील इच्छुक रक्तदात्यानी रक्तदान करुन रक्तदानाच्या राष्ट्रिय सामाजिक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे,सचिव दयानंद बिरादार यांच्यासह पदाधिकार्यांनी व सर्व पत्रकार यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा