पी.टी.ए.च्या वतीने सभापती प्रा.शिवाजीराव मुळे यांचा सत्कार 

पी.टी.ए.च्या वतीने सभापती प्रा.शिवाजीराव मुळे यांचा सत्कार 


उदगीर : येथील पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे यांचा खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंदरआण्णा वैजापुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर पाटील , चंदर आण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील साहेब, पी.टी.ए चे राज्य उपाध्यक्ष प्रा.गोपाळकृष्ण घोडके, पी.टी.ए चे तालुका अध्यक्ष प्रा. सिध्देश्वर पटणे, पी.टी.ए.चे सचिव प्रा. प्रदीप वीरकपाळे उपस्थित होते. 


यावेळी प्रा.शिवाजीराव मुळे सर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचीत भव्य सत्कार करण्यात आला.यानंतर प्रा.सिध्देश्वर पटणे, प्रा. प्रदीप वीरकपाळे, प्रा.गोपाळकृष्ण घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुळे सरांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


प्रा. मुळे यांनी सत्काराला उत्तर देताना पी.टी.ए चे आम्हाला सदैव सहकार्य राहिले असून आम्ही सदैव पी.टी.ए च्या पाठीशी आहोत असे सांगून माझ्या आई वडिलांनी माझे नाव शिवाजी ठेवले आहे आणि छत्रपती शिवाजी हे माझे आदर्श आहेत त्यामुळे या नावाला डाग लागेल अस कृत्य मी कधीच करणार नाही असे सांगत, पंचायत समिती सदस्यांनी व उदगीर तालुक्यातील जनतेनी टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो आणि सदैव आपल्या आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.संजय जामकर तर प्रास्ताविक व आभार प्रा. सिध्देश्वर पटणे यांनी केले.या कार्यक्रमासाठी डॉ.धनंजय पाटील, प्रा.सोमनाथ बिराजदार, प्रा.योगेश पाटील, प्रा.रविकिरण पतंगे, प्रा.रामचंद्र बिरादार, प्रा.राजकुमार बिरादार, प्रा.सचिन शिंदे, प्रा.राजकुमार तोंडारे, प्रा.संतोष ख्याडे,प्रा.नितीन उबाळे,प्रा.जावेद शेख, प्रा.राहूल बेद्रे, विकास दुपारे, ज्ञानेश्वर माने, चंद्रकांत काटवाटे, वैभव टेकाळे यांच्यासहित पी.टी.ए. चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
लातूर लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान ; 19 लाखापेक्षा अधिक मतदार संख्या • जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू • मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे
इमेज
आंध्र प्रदेशातील विद्यार्थांना उदगीरच्या निवारा केंद्राचा आधार नगराध्यक्ष बागबंदे यांची तत्परता : घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू उदगीर: उदगीरच्या रेल्वे पटरीवरुन काही विध्यार्थ्यांचा ग्रुप हैदराबादकडे पायी जात असल्याची माहिती मिळताच तत्परता दाखवीत उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची सोय केली. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असल्याचे नगराध्यक्ष बागबंदे यांनी सांगितले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व शेजारच्या जिल्ह्यातील 16 विद्यार्थी उदगीर येथील ऍग्रीकल्चर ट्रेनिंग सेंटर येथे ट्रेनिंग घेत असत. शहरातील एस. टी. कॉलनी भागात एकत्र होस्टेलवर रहायला होते. सध्या देशभरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढला असून तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय झाली. देशात कोरोना विषाणूंमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंतेपोटी विद्यार्थ्यांना गावाकडे परत येण्याचा आग्रह धरला होता. एकीकडे पालकांचा आग्रह तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे परत जाण्यासाठी कसलीच सोय नसल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले होते. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित विचार करून पायी गावाकडे जाण्याची तयारी केली. आपले सामान खांद्यावर घेऊन रेल्वे पटरी मार्गाने हे सर्व विद्यार्थी गावाकडे जायला निघाले. भाजपाच्या कार्यकर्त्यास हे लक्षात आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे रयांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली. नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी तात्काळ माणुसकीच्या भावनेतून तत्परता दाखवित रोटी कपडा बँकेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांची उदगीर नगर परिषदेने बांधलेल्या निवारा केंद्रात राहण्याची व जेवणाची सोय केली. शिवाय या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सर्व ती मदत करणार असल्याचे सांगत त्यांच्या जाण्याची सोय होइपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांची या निवारा केंद्रात सर्व सोय करण्याच्या सूचना संबंधितांना देऊन नगराध्यक्षांनी वैयक्तिक पाच हजार रुपये या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी दिले. यावेळी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना हात मास्क व सॅनिटायझर्सचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, रामचंद्र मुक्कावार, अॅड. दत्ताजी पाटील, अॅड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, रोटी कपडा बँकेचे खुर्शीद आलम व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान नगरसेवक अॅड. दत्ताजी पाटील यांनी श्रीकोलमच्या प्रशासनासोबत या विद्यार्थ्यांचा संवाद साधून दिला.
इमेज
*राष्ट्रपतीच्या दौऱ्यासाठी उदगीर नगरी सज्ज*
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज