शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपयाचे अनुदान द्यावे: भाजपाची मागणी


उदगीर : उदगीर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी उदगीर च्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.


यावर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे खरीप पीक व ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी पंचनामे करून सरसकट 50 हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.


हे निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, नगरसेवक मनोज पुदाले, ऍड. दत्ताजी पाटील, गणेश गायकवाड, दिलीप मजगे , लक्ष्मण भालके , नारायण मिरगे, रवी काळा ऍड. महेश मळगे, प्रमोद मुदाळे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर शहराध्यक्षपदी सरोजा वारकरे
इमेज