बोळेगाव येथे प.दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन : पंडित उपाध्याय यांचा विचार आचरणात आणा: राहुल केंद्रे

बोळेगाव येथे प.दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन


पंडित उपाध्याय यांचा विचार आचरणात आणा: राहुल केंद्रे


शिरूर अनंतपाळ: भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आचरणात आणून पक्षाची व देशाची सेवा करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केले.


भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे बोळेगाव बु येथे जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पुजन व जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला तसेच 70 फळझाडांचे वृक्ष वितरित करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणुन परमेश्वर गौंड होते. प्रमुख पाहुणे लातुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर चेवले, भाजपा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश बदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तानाजी बिराजदार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश धुमाळे, ऋषिकेश फड़ भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस महेश लुल्ले, पं. दीनदयाळ उपाध्याय फौंडेशन जिल्हा अध्यक्ष सुरेशजी जाधव, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा गणेश मोहिते, गणेश सलगरे शहर अध्यक्ष, भागवत गड्डीमे नागीणताई सलसेकर,अमित बोळेगावकर तालुका संघटन सरचिटणीस युवा मोर्चा, माधव सूर्यवंशी, प्रशांत पाटील, लक्ष्मण पाटील,सागर मुरुडकर, सचिन हसनाळे, आदी युवा मोर्चा कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक व आशाताई कार्यकर्त्या उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज