अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी: प्रहार संघटनेचे निवेदन

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी:


प्रहार संघटनेचे निवेदन


उदगीर:लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील ढगफुटी अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व पीकांचे, घरांचे नुकसान झाल्याने एक गाव एक पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्याना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद तेलंगे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय उदगीर येथे निवेदनाद्वारे केली आहे .


पावसाने हाहाकार माजवला असून अगोदरच अतिवृष्टीमुळे मूग उडीद तीळ पूर्णपणे गेलेत जमा असताना आता हाताशी आलेले सोयाबीन , ज्वारी ऊस, तुर या पीकाचे ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे कोरोना महामारीमुळे त्रस्त असलेल्या नागरीकांना आता ढगफुटी व झालेल्या अतिवृष्टीने पूर्ण कंबरडे मोडले आहे. त्यामुळे  तालुक्यातील सर्व नुकसान लक्षात घेता शासनाने व प्रशासनाने एक गाव क पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर ‘मदत द्यावी व अतिवृष्टी व ढगफुटीमुळे नैसर्गीक भुस्खलन झाल्याने शासन निर्णयातील तरतुदीनुसार पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना ४८ तासात पीकविमा मंजूर बाबत आदेश देण्यात यावे अन्यथा शासन व प्रशासन येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल अशा प्रकारचा निवेदन प्रहार जनशक्ती चे तालुका अध्यक्ष विनोद तेलंगे,महादेव मोतीपवळे, सुनील केंद्रे, सुर्यभान मामा चिखले,अभय कुलकर्णी, अविनाश शिंदे, संदीप पवार,गोपाल नवरखेले, शेषराव भोसले, अंगद मुळे, निळकंठ मुदोळकर, गणेश कांबळे, संदीप सुर्यवंशी, श्रीकृष्ण होळे, राजकुमार पाटील इतर प्रहार सेवक व शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय देण्यात आले.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज