उदगीर मेडिकल संघटनेचा उपक्रम: जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य सफाई कामगारांचा सत्कार करून मास्क व सॅनिटायझर चे वाटप... -----------------------

उदगीर मेडिकल संघटनेचा उपक्रम: जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य सफाई कामगारांचा सत्कार करून मास्क व सॅनिटायझर चे वाटप...


-----------------------


उदगीर: जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून उदगीर मेडिकल संघटनेच्या वतीने सफाई कामगारांचा सत्कार करून त्यांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. येथील लक्ष्मी नारायण मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमास नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले, डॉ. विजय कुमार पाटील , नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, विनोद रांगवाल,प्रदीप बोरगाव, संतोष सूर्यवंशी व माहेश्वरी समाजातील सामाजिक कार्यकर्ते श्याम सुंदर सारडा यांच्या हस्ते उदगीर नगर पालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती चे सफाई कर्मचारी व उदगीर येथील घर पोच सेवा देणारे गॅस कर्मचारी यांचा मास्क व सॅनिटायझर देऊन सत्कार करण्यात आला.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओम् प्रकाश कलकोटे, साबेरी शेख, रामविलास नावंदर व बालाजी भ्रमणा यांनी परिश्रम घेतले.