अमोल कुलकर्णी यांना 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार जाहीर

अमोल कुलकर्णी यांना 'शांतिस्वरूप भटनागर' पुरस्कार जाहीर


-----------------------


उदगीर : मूळचा उदगीर येथील रहिवाशी असलेले सध्या पुणेस्थित असलेले संशोधक अमोल अरविंदराव कुलकर्णी यांना आज प्रतिष्ठेचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. 


 


अमोल कुलकर्णी यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण उदगीरच्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयातुन घेतले असून सध्या ते पुणे येथे एन एस एल कंपनीत संशोधक म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या अभ्यासू वृत्तीची, संशोधन वृत्तीची व कामाची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित असा समजला जाणारा भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. 


अमोल कुलकर्णी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या उदगीर येथील मित्रपरिवाराकडून अभिनंदन केले जात आहे.