जिल्हयात माझे कुटुंब-माझी जबाबदारी
मोहिम भव्य स्पर्धाचे आयोजन
लातूर, :- जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांच्या मार्फत माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेसाठी भव्य स्पर्धांचे आयोजन केले असून स्पर्धेचे वेळापत्रक, कालावधी, वयोगट, पारितोषीके पुढील प्रमाणे राहतील असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
विषय- माझे कुटुंब-माझी जबाबदारी- तालुकास्तर 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हास्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.
स्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा् स्तरावर पाठविण्यात यावेत.वयोगट 6 वी ते 10 वी साठी शब्दमर्यादा 500 ते 750 व खुल्या गटासाठी 750 ते 1200 शब्दांची राहील. निबंधाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात स्वत:चे पूर्ण नाव, शाळेचे नाव, तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खाते क्रमांकनमुद करावा. तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडिओ चित्रीकरण/ फोटो मागवून घ्यावे.
संदेश (मॅसेज) स्पर्धा- विषय- आरोग्य शिक्षण विषयक जनजागृती संदेश स्पर्धा- तालुकास्तर 25 स्पटेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हािस्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.
स्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा् स्तरावर पाठविण्यात यावेत. संदेश हा स्वनिर्मित, सुस्पष्ट (जास्तीत जास्त चार ओळीत) व आरोग्य शिक्षण विषयाशी निगडीत असावा.संदेश पृष्ठाच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात स्वत:चे पूर्ण नाव, शाळेचे नाव, तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बॅक खातेक्रमांक नमुद करावा.सदर संदेश स्कून करुन संबंधित कार्यालयाच्या ई-मेल/ व्हॅटस्अप क्रमांकावर पाठवावा. तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण/ फोटो मागवून घ्यावे.
पोस्टर्स स्पर्धा- विषय कोवीड-19 राष्ट्रीय आपत्ती विषयक जनजागृती- तालुकास्तर 25 स्पटेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हाास्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.
स्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे निबंध आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हा् स्तरावर पाठविण्यात यावेत. पोस्टर्स स्वनिर्मित, विषयाशी निगडीत, A4साईज ड्रॉईंगशिटवर असावेत. रंगाच्या माध्यमाचे बंधन असणार नाही.तसेच आवश्यकतेनुसार चित्रावर एखादे घोषवाक्य (स्लोगन्स) टाकता येईल.पोस्टर्सच्या सुरुवातीला उजव्या कापऱ्यात स्वत:चे पूर्ण नाव, शाळेचे नाव,तालुका, भ्रमणध्वनी क्रमांक आणि बँक खातेक्रमांक नमुद करावा.तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण/ फोटो मागवून घ्यावे.
जिंगल / गीतगायन / शॉर्ट फिल्म स्पर्धा- विषय-कोवीड-19 विषयक जनजागृती- तालुकास्तर 25 स्पटेंबर ते 2 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र, सनियंणत्र अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी , गटशिक्षणाधिकारी, तालुका बालविकास अधिकारी. जिल्हागस्तर- 7 ऑक्टोंबर 2020 इ.6 वी ते 10 वी खुला गट, प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिस.
स्पर्धेची नियमावली- तालुकास्तरावर स्पर्धा घेवून प्रत्येकी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकाची व्हिडीओ क्लिप/ रेकॉर्डींगची आपल्या स्तरावर तीन परीक्षाकांमार्फत निवड करुन दि. 5 ऑक्टोंबर 2020 पर्यंत जिल्हाी स्तरावर पाठविण्यात यावेत. व्हिडीओ क्लिप ही स्वनिर्मित, विषयाशी निगडीत, किमान 2 मिनिटे व कमाल 5 मिनिटाची असावी. व्हिडीओ क्लिप व्दारे दिला जाणारा संदेश सर्वांना समजेल असा सुस्पष्ट व सोप्या भाषेत असावा. क्लिप ओपन नाही झाल्यास त्याची जबाबदारी स्पर्धकावर राहील.शॉर्टफिल्म तयार करताना अन्य सदस्यांचाही सहभाग घेवून अभिनयात्मक संदेश क्लिप तयार करता येईल.तालुकास्तरावरील स्पर्धकांचे शक्य असल्यास स्पर्धा सुरु असतानाचे व्हिडीओ चित्रीकरण/फोटो मागवून घ्यावे.
तालुकास्तरावरुन पाठविण्यात येणारे स्पर्धेचे निकाल mkmjspardha@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. सर्व स्पर्धासाठी परीक्षकांचा अंतिम राहील. जिल्हास्तरावर सर्व स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय येणाऱ्या स्पर्धकांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. सदरील स्पर्धेची अंमलबजावणी करीत असताना कोवीड-19 बाबतच्या शासनाने निर्गमित केलेल्या सर्व निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील.