*बिएलओना त्वरित मानधन द्या शिक्षक समितीची मागणी ......*

*बिएलओना त्वरित मानधन द्या शिक्षक समितीची मागणी ......*


 


निलंगा: आज दिनांक 30 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती निलंगा यांच्यावतीने तहसीलदार साहेब यांना बीएलओच्या अडचणी संदर्भात निवेदन देण्यात आले. त्यात मागील वर्षाचे थकित मानधन त्वरित देण्यात यावे, तसेच बीेलओची कामे फक्त शिक्षकांना न देता सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांना समसमान द्यावे, तसेच शिक्षक बीएलओना शैक्षणिक ताण खूप असल्याकारणाने त्यांची बीेेेएलओची कामे रद्द करण्यात यावी. व स्वतंत्र आस्थापना निर्माण करण्यात यावी .तसेच जे शिक्षक covid-19 या कामात नियुक्त केले आहेत त्यांना 50 लाखाचे कव्हरिंग देण्यात यावे. या प्रमुख मागण्या होत्या. यावेळी शिक्षक समितीचे नेते तसेच जिल्हा परिषद जिल्हा परिषद लातूर चे स्वीकृत सदस्य अरुणजी सोळुंके तालुकाध्यक्ष संजय कदम, सचिव गणेश गायकवाड, संचालक लखनेे , बी एल ओ सुनील टोपे, बी.एम पाटील, सुभाष चौधरी ,किरण गोंदगे, भास्कर सोळुंके संतोष सुर्यवंशी ओम गेेंदेवाड, मुरमे सर, शिवा राठोड व शिक्षक समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते .त्याप्रसंगी तहसीलदार साहेब यांच्या वतीने अडसूळ साहेबांनी (नायब तहसीलदार निलंगा) यांनी निवेदन स्वीकारले.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज