तत्वनिष्ठ प्राध्यापक धनगे यांची उपप्राचार्य पदी निवड
उदगीर: (डि. के. उजळंबकर)
येथील किसान प्रसारक मंडळ द्वारा संचलित शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नुकतीच तत्वनिष्ठ प्राध्यापक धनगे एस. एस. यांची निवड करण्यात आली.
विद्यार्थीप्रिय प्राध्यापक धनगे सर यांची त्यांची ओळख असून, तब्बल 35 वर्ष सेवेनंतर संस्थाने त्यांना शिवाजी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी निवड करत एक तत्वनिष्ठ प्राध्यापकास सन्मान केला असल्याचे दिसून येत आहे. प्राध्यापक धनगे हे सीमाभागातील रहिवासी असून त्यांनी आपल्या प्राध्यापक सेवेमध्ये याच भागातील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देत आपली कामगिरी बजावली आहे.
प्राध्यापक धनगे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुद्धा विविध आंदोलनात काम केले असून ते सदस्य आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजयकुमार पाटील, सचिव झोडगे, उपाध्यक्ष रंगराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव, प्रा. रंगनाथन कुंटे, प्रा. आर. जी. जाधव, प्रा. देवी कांबळे,डी .आर .पाटील इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा