प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा -राज्यमंत्री संजय बनसोडे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावा -राज्यमंत्री संजय बनसोडे


लातूर:- जिल्हृयामध्ये यावर्षी आजअखेर सरासरीच्या 105% पाऊस पडलेला असून काही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सुध्दा झालेली आहे. तसेच मागील 10 दिवसापासुन सतत पाऊस होत असून यामूळेही काही ‍ठिकाणी पुर/क्षेत्र जलमय होऊन पिकांचे नुकसान होत आहे. यानुषंगाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे वर नमूद कारणाने नुकसान झालेले आहे असा कोणताही शेतकरी पंचनाम्यामधून सूटणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत प्रशासनास सूचना दिलेल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत अर्ज करावा, असे आवाहन संसदीय कार्य, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.


जिल्हृयामध्ये पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तीक शेतातील पिकाचे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने पिक नुकसान पूर्वसुचना देण्याकरीता सूविधा उपलब्ध आहे. पिक विमा योजनेमध्ये शेतात पाणी थांबून राहील्यामूळे झालेले नुकसान व पूराचे पाणी शेतात घूसल्याने झालेले नुकसान या दोन बाबींमूळे झालेले नुकसानी संदर्भात नुकसान भरपाई मिळू शकते. ज्या शेतकऱ्यांचे वरील कारणाने नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. ऑफलाईन अर्जासाठी प्रत्येक तालूक्याच्या तालूका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये विमा कंपनीचा प्रतिनिधी उपलब्ध आहे. या संबंधाने शेतकरी या प्रतिनिधीकडे अर्ज करु शकतात अर्जासोबत पिक विमा भरल्याची पावती व 7/12 उतारा कागदपत्र सादर करावीत.


शेतकरी ऑफलाईन अर्ज बँक/महसूल विभाग/कृषि विभाग यांच्याकडेही करु शकतील. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Crop Insurance मोबाइल ॲपचा वापर करुन नुकसानीची सूचना देता येईल.


तरी ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत ऑफलाईन/ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन राज्यमंत्री बनसोडे यांनी ‍जिल्हृयातील शेतकऱ्यांना केले आहे.


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image