माझे कुटुंब., माझी जबाबदारी..! चला आता थांबवू या, ही बेफिकिरी*...!                *नवनाथ गायकवाड*

माझे कुटुंब., माझी जबाबदारी..! चला आता थांबवू या, ही बेफिकिरी*...!


नवनाथ गायकवाड*


*उदगीर व उदगीर तालुक्यातील माझ्या सर्व लहानथोर मित्रांनो, सहकाऱ्यांनों भगिनींनो, आणि बाबांनो.., आज आपण सर्वचजण आर्थिक., मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थरकाप, आणि सर्वांची झोप उडविणारा कोरोनाचा जीवघेणा हाहाकार अनुभवत आहोत.. याकामी राज्य शासन, जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन आणि राजकीय व सामाजिक कार्यकर्ते इत्यादी सर्वच स्तरावरून दिवस रात्र 1 करून जीवाची बाजी लाऊन आपणाला कोरोनापासुन वाचवून आपलं सर्वांचचं सामाजिक आरोग्य तंदुरूस्त ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे.... तरीही दुर्देव त्यात म्हणावं तसं यश येत नाहीये, आणी याला आपणचं सर्वस्वी जबाबदार आहोत असं माझं स्पष्ट मत आहे..* *आपण मागे वाचलोच., ऐकलोच होतो की भल्या सकाळी सणादिवशी समाज इकडे उत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना एक अधिकारी मात्र [ मुख्याधिकारी राठोड साहेब ] तिकडे तब्बल 6 कोरोणाबाधित प्रेताची अंत्यविधी करतोय. म्हणजेच जागरूक शासण आणी बेफिकिर बेलगाम समाज यातील ही किती मोठी विसंगती म्हणावी लागेल..आणी या सर्व अक्षम्य घटनेला आपणंच जबाबदार आहोत.. आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोरोना आणी त्यांचा संसर्ग हा जास्तीत जास्त आपल्या घरातील , परिसरातील आणि गावातील 60 वर्षावरीलच वृद्ध आजी आजोबांना झपाट्याने होऊण त्यांना आपल्या मृत्यूच्या कवेत ओढत असल्याचं वास्तव आपल्या निदर्शनास येईल.. यात कोणाचे आजोबा, कोणाचे वडील, कोणाचे काका, कोणाचे भाऊजी तर कोणाच्या घरचे कर्ते पुरूष तर कोणाच्या घराचे शेजारी आहेत..* *माझ्या वाचकांनो मी माझ्या निरिक्षणातून सांगतोय "प्रत्येक वृद्ध व्यक्ती हा आज कोरोना बाधित नाहीये पण., यामध्ये मृत झालेला प्रत्येक कोरोना बाधित व्यक्ती हा वृद्धच आहे." हे आजचं वास्तव तुम्हाला नाकारता येणार नाही.. मग या निष्पाप वृद्ध आणि बालकांना होणाऱ्या संसर्गाला आपण आणि आपलं बेफिकीर वर्तनचं कारणीभूत आहे ना..*


*बाबांनो आपण प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडूनंच अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, यात आपल्या कुटुंबातील एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या कुटुंब रक्षणाची, त्यांच्या जीवाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी बनतेच., अहो म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावतोय या पद्धतीचं अमानवीय वर्तन आज आपलं चाललेलं आहे आणि हे कुविचार, दुष्कृत्य आज आपण कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे.. आज आपण सर्वांनी एका क्षणासाठी का होईना विचार करणं गरजेचं आहे.. सरकार आज तब्बल 6 महिन्यांपासून सर्वच पातळीवर आटोकाट, पुरेपूर प्रयत्न करूनही...., आज हा सामूहिक सामाजिक संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे आणि आपण सर्वांसाठी हा खूप चिंतनाचा विषय बनलेला आहे.. म्हणूनच सरकारने आपण सर्वांना विनंती करून "आपले कुटुंब आपली जबाबदारी" ही संकल्पना आज आणलेली आहे. आपण सर्वांनी आपल्या घरातील सर्व व्यक्तीचे टेस्ट करून घेणं आणि सुरक्षित राहणं हेच या योजनेचा मुख्य हेतू आहे, आणि हे योग्यही आहे .. मी जवळपास सामाजिक सेवेच्या उपक्रमातून तब्बल 6 महिने समाजामध्ये कार्यरत असल्यामुळे तसेच एक जबाबदार नागरिक, आणि सामजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या कुटुंब रक्षणाची, समाजातील माझ्या सर्वच बांधवाची आरोग्य रक्षणाची जबाबदारी बनत असल्यामुळे सरकारच्या या योजनेचा पुरस्कार करून, प्रतिसाद देऊन मी स्वतःव माझे कुटुंब दि.16 - 09 - 2020 रोजी उदगीर उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट करून घेतलेली आहे..*


*अखेरीस मी सर्वांना एक विनंती करतो, एक भावनिक आवाहन करू इच्छितो की आपण ही या जीवघेण्या संसर्गाला सहज न घेता गाफील न राहता, आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या खाईत न लोटता थोडंसं जागरूक बनून , डोळस बनुन सरकारच्या या योजनेला प्रतिसाद देऊन आपल्या ही परिवारातील सर्व सदस्यांची टेस्ट करून घ्यावी व सुरक्षित राहावे अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. कारण..... या आयुष्यात Strong Health is Great wealth अर्थातच निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे हे मात्र निर्विवाद सत्य आहे*....


   *काळजी घ्या,सुरक्षित रहा*...!


.


              *आपलाच*


*नवनाथ मारोतीराव गायकवाड*


प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा निरीक्षक


राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल, महाराष्ट्र


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही