युवा नेते अरविंद पाटील यांनी कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

युवा नेते अरविंद पाटील यांनी कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा


निलंगा : भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप सौन्दळे यांच्यासमवेत बैठक घेऊन तिथे असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.


निलंगा तालुक्यातील कोरोना रुगांना दिले जाणारे उपचार व त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. उपजिल्हा रुग्णालयात कुठल्या गोष्टींची कमतरता आहे तसेच ऑक्सीजनची सद्यस्थिती व उपलब्ध बेडची माहिती यावेळी घेतली.


नागरिकांनी सध्या प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, मनामध्ये कसल्याही प्रकारची भीती बाळगू नये, काही लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, सध्या आरोग्य विषयाची जी टीम आपल्या घरी येत आहे त्यांना सहकार्य करावे असे अरविंद पाटील निलंगेकर यांनी नागरिकांना केले आहे.


यावेळी डॉ.दिलीपज सौंदळे यांनी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे मागणी केलेल्या फिंगर पल्स ऑक्सिमीटर 100, इन्फ्रारेड थर्मोमिटर 100, डिजिटल ई.सी.जी. मशीन 10, न्यूबिलायझर 20, पल्स ऑक्सिमीटर टेबल टॉप (बीपीएल) 10, मल्टीपॅरा मॉनिटर 5, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन 10, ऑक्सिजन सिलिंडर जम्बो 20, व्हील चेअर 10, ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली (जम्बो) 10 व हॉस्पिटल बॅकरेस्ट कोट 10 या वस्तूंची त्वरित पूर्तता करण्यासाठी तात्काळ निधीचे पत्रही दिले.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज