*अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित व्हावेत-आ. संभाजी पाटील* निलंगेकर*
*घरात विलगीकरण असणार्यांचा दररोज आढावा घ्यावा*
निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा विधानसभा मतदारसंघतील तीनही तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन भरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबधित अधिकर्यांना देण्यात याव्यात. तसेच जे कोरोना रुग्ण घरात विलगकरण करण्यात आलेले आहेत या रुग्णाचा आढावा घेऊन दिवसातून किमान एकदा पाहणी व तिनदा विचारणा करण्यात यावी अशा सुचना माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांना केल्या.सध्या जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरु आहे. या अतिवृष्टी चा आढावा व सध्या सुरु असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनाचा आढावा घेण्यासाठी येथील उपजिल्हाकार्यालयात माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षेतेत आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीला उपजिल्हाअधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, सुरेश घोळवे, ए.टी. जटाळे, शिरुर अनंतपाळचे एन.एस. शेरखाने, देवणीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. कदम, कृषी अधिकारी संजय नाबदे, ए.बी. चव्हाण, आर.एस. कदम, एस.बी आडे, नायब तहसीलदार ए.ए. महापूरे , चेअरमन दंगडू सांळूके आदी उपस्थित होते.सध्या राज्यसह जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यातील पिकांच्या झालेल्या नुकसनीची पाहणी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्व:ता शेती बांधावर जाऊन केली आहे. तसेच जिल्ह्यात सर्वत्र जिल्हा परिषद यंत्रणे मार्फत करण्यात आली आहे. या पाहणी दौर्यानंतर आज येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी यंत्रणे कडून करण्यात आलेल्या नुकसानीचा अहवाल घेऊन सर्वाना त्वरीत पंचनामे करण्याचा सुचना त्यांनी केल्या. त्याच बरोबर अतिवृष्टीने देवणी तालुक्यातील फुटलेल्या पाझर तलावातील पाण्याने शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना शासना मार्फत नुकसान भरपाई देण्यासाठी शासनकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाय योजनांचा आढावा त्यांनी घेतला. यात कोरोनाने होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने रुग्णांशी सुसंवाद साधून योग्य औषधपोचार करण्यात यावेत. तसेच संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. तसेच त्याची योग्य काळजी घेऊन त्यांच्या उपचाराकडे वरिष्ट अधिकार्यांनी लक्ष देण्याच्या सुचना आ. निलंगेकरांनी यावेळी केल्या आहेत. याचबरोबर घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णासाठी एक आरोग्य पथक तयार करुन त्यांची पण दिवसातून किमान एकदा तपासणी व फोन द्वारे तीनदा विचारणा करण्यात यावी अशीही सुचना माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केल्या.
addComments
टिप्पणी पोस्ट करा