ग्रामीण भागामध्ये बचत गट बनले स्वावलंबी: बँक आपल्या गावी एसबीआय चा पुढाकार- प्रबंधक अविराज गवळी

ग्रामीण भागामध्ये बचत गट बनले स्वावलंबी:


बँक आपल्या गावी एसबीआय चा पुढाकार- प्रबंधक अविराज गवळी


उदगीर : (डि. के. उजळंबकर)


सध्या कोरोनाच्या सावटाखाली लॉकडाउन मध्ये गाव पातळीवरील बचत गटांना अर्थसहाय्य करत सक्षमीकरण करण्यासाठी व शासनाच्या महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया सदैव तत्पर असून थेट गाव पातळीवर जात संबंधित बचत गटांना अर्थसहाय्य करत असून बँक आपल्या गावी संकल्पना राबवीत बँक आपल्या गावी असल्याचे मत सह प्रबंधक अविराज गवळी यांनी व्यक्त केले. यामुळे ग्रामीण भागातील बचत गटांना थेट बँकेत न बोलता त्यांना गाव पातळीवर अर्थसहाय्य करण्यासाठी बँक तेथे गाव ही योजना सध्या बँकेच्या वतीने चालू करण्यात आली आहे.


गेल्या सहा महिन्यापासून या परिसरामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे. या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या ज्यांचं पोट हातावर होतं त्यांनासुद्धा जगणं मुश्किल झालं. परंतु गाव पातळीवरील बचत गटांना थेट गावात जाऊन अर्थसहाय्य करण्याचा पुढाकार स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने घेत बचत गटांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न व त्यांना अर्थसहाय्य करत एक प्रकारे गटांना सक्षमीकरण करत असल्याचे दाखवून दिली आहे असे मत बँकेचे सहप्रबंधक अविराज गवळी यांनी प्रत्येक गावात बचत गटांना कर्ज वाटप करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रबंधक सुब्रमण्यम यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. ते म्हणाले की आपली बँक जिव्हाळ्याची बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया याठिकाणी गरजवंत बचतगटांना गाव तेथे बँक हे तत्व वापरत आम्ही सदैव तत्पर आहोत हे दाखवून दिले असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.


स्टेट बँक ऑफ इंडिया व उदगीर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील तोंडार लोणी हकनकवाडी माळेवाडी पिंपरी मादलापूर मांजरी शिरोळ जानापुर इत्यादी 10 गावातील बचत गटांना 85 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे एक प्रकारे बचत गटांना थेट गावापर्यंत जात लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य करण्याचा प्रयत्न असल्याचे मत स्टेट बँक ऑफ इंडियाचे सह प्रबंधक अविराज गवळी यांच्या माध्यमातून तालुक्यातील दहा गावातील 70 बचत गटांना तब्बल 85 लाख रुपयाचे कर्ज वाटप यावेळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बालाजी दापके बँकचे कृषी सहाय्यक नागेश माळी फिल्ड ऑफिसर नितीन शेंडे राहुल भांजे विकास कांबळे गावाचे सरपंच ग्राम पंचायत सदस्य उपसरपंच व ज्येष्ठ नागरिक बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज