अनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी

अनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करण्याची धनगर समाजाची मागणी


निलंगा:   अनुसूचित जमातीच्या आरक्षण तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी निलंगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीने उपजिल्हाधिकारी च्या मार्फत मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे. 


                महाराष्ट्रतील धनगर समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे या मागणीसाठी महाराष्ट्रभर धरणे अदोलन मोर्चे रस्ता रोको आमरण उपोषण करीत आहेत गत भाजपा सरकारने आरक्षण देण्याचं आश्वासन दिले होते त्यांनीही दिलेला शब्द पाळला नाही. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यास सर्वच राजकीय पक्षांनी पाठींबा दिलेला आहे. आता आघाडी सरकार आहे या आघाडीत कॉग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्षा चे सरकार आहेे. या तिन्ही पक्षाचा पाठींबा आहे मग विरोध राहिला नाही तरी सरकारने तात्काळ धनगर समाजाचे संविधानिक न्याय हक्काचे अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अमलबजावणी करा,अशी मागणी निलंगा तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहेे.  या निवेदनावर जेष्ठ समाज सेवक झटींग (अण्णा)म्हेत्रे युवराज जोगी मुरलीधर अचूळे नामदेव काळे भगीरथ वरवटे संदीप वजीर इंद्रजित कोकरे लक्ष्मण पाटील आदी सह धनगर समाज बांधवांच्या सह्या आहेत.