हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची लढाई ही स्वातंत्र्याचा हुंकार : कोमसापच्या व्याख्यानमालेत गुडसूरकर यांचे प्रतिपादन   

हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची लढाई ही स्वातंत्र्याचा हुंकार


कोमसापच्या व्याख्यानमालेत गुडसूरकर यांचे प्रतिपादन 



ठाणे (प्रतिनिधी)


मराठवाडामुक्तीचा लढा हा केवळ सत्तांतराचा नव्हता तर सरंजमशाहीविरोधातील लोकशाहीवादी वृत्तीने दिलेला लढा होता.मुक्तीलढ्याला यश होऊन जुलमी निजामी सत्तेचा शेवट ही भारतीय स्वातंत्र्याची पूर्ती होती असे मत अभ्यासक धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले.


    *कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती* आयोजित *"मराठवाडा मुक्तीसंग्राम:स्वातंत्र्याची परिपूर्ती"* या विषयावर आयोजित फेसबुक लाईव्ह व्याख्यानात ते बोलत होते."भारतीय स्वातंत्र्यलढ्याएवढाच मराठवाडा मुक्तीसंग्रामही महत्वाचा होता.एकवीस हजार स्वातंत्र्यसैनिक,शंभर सशस्त्र कँप,लढ्यात तन मन आणि धनाने सहभागी होऊन प्राण तळहातावर घेऊन लढणारी सामान्य माणसं यांच्या त्यागाचं योगदान मोजले जाऊ शकत नाही एवढे मोठे आहे.येथील जनतेने जुलमी राजवटीविरूद्ध उठविलेला आवाज स्वतंत्र भारताने ऐकून या लढ्याला दिलेले बळ हे भारतीय स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरले.देशाच्या मध्यस्थानावरील हा जुलमी हैदोस वेळीच रोकला गेला नसता तर तो स्वतंत्र भारतासाठी अत्यंत धोक्याचा होता.या लढ्याला जातीय स्वरूप आणण्याचा प्रयत्न जुलमी सत्तेने केला पण स्टेट काँग्रेसच्या नेत्यांनी वैचारिक भूमिका घेऊन तो उधळवून लावला.त्यामुळे या लढ्याला वेगळा रंग दिला जाऊ नये अशी अपेक्षा गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


 स्वातंत्र्योत्तर काळातही मराठवाड्याच्या नशिबी कायम संघर्ष राहिला आहे.या स्वातंत्र्याच्या लढाईचा विसर पडतो की काय ? अशी परिस्थिती असून महाराष्ट्राच्या नव्या पिढीला हा इतिहास समजून सांगण्याची गरज गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केली.निजामी राजवटीने व रजाकारांनी सत्तांध होऊन केलेला अनन्वित अत्याचार हा मानवतेवरील कलंक होता असे ते पुढे बोलताना म्हणाले.स्वामी रामानंद तीर्थ,बाबासाहेब परांजपे व गोविंदभाई श्राॕफ या त्रिमूर्तींनी या लढ्याला दिलेले वळण हे महत्त्वाचे ठरले असे त्यांनी सांगितले.संयोजक प्रा.दीपा ठाणेकर यांनी मराठवाड्याबाहेरील महाराष्ट्रासमोर हा इतिहास उजळण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रास्तविकातून सांगितले.आकाश नलावडे,वैभव पाडावे,सांब शास्री यांनी यासाठी पुढाकार घेतला.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही