भिवंडी दुर्घटनेत हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश

 


भिवंडी दुर्घटनेत हाळी येथील एकाच कुटूंबातील सहा जणांचा समावेश


हाळी हंडरगुळी - भिवंडी येथील इमारत दुर्घटनेत उदगीर तालुक्यातील हाळी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे हाळी गावावर शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळी पर्यंत सहा पैकी चार जणांचे मृतदेह मिळाल्याचे कुटूंबियांनी सांगीतले.


हाळी येथील शेख कुटूंबातील आरीफ युसूफ शेख हा तरूण पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई येथे आठ वर्षांपूर्वी पत्नी व तीन मुलांस गेला होता. तो खाजगी गाडीवर चालक म्हणून कामाला लागला. त्याचा संसार आनंदात सुरू होता. गावी असलेल्या भावालाही त्याने महिनाभरापूर्वी कामासाठी भिवंडीला बोलावून घेतले. राहण्यासाठी तो भिवंडी येथील जिलानी इमारतीत रहायला होता. मात्र नियतीला ते मान्य झाले नाही. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली. त्यात इतर कुटूंबासह जिलानीचे कुटूंब गाडले गेले. त्यात कुटूंबप्रमुख आरीफ युसूफ शेख ३२ वर्षे, नसीमा आरीफ शेख २७ वर्षे, निदा आरीफ शेख १० वर्षे, सादिया आरीफ शेख ७ वर्षे, हसनैन आरीफ शेख ३ वर्षे, सोहेल युसूफ शेख २२ वर्षे यांचा त्यात समावेश आहे.


सदर घटनेची माहिती मिळताच हाळी गावावर शोककळा पसरली. कुटूंबातील काही सदस्य तात्काळ भिवंडीकडे रवाना झाले. मंगळवारी पाच वाजेपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडल्याचे कुटूंबियांनी सांगीतले. दरम्यान एकाही मयताला गावी न आणता येत असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


* दोनच मुले - युसूफ शेख हे हाळी येथे मंजुरी करून उपजीविका भागवायचे यास दोन मुले व दोन मुली होत्या. दोन मुलींचे व एका मुलाचे लग्न झाले होते. मात्र दोन्ही मुले व मुलाचे मुले मृत्यू पावली असल्याचे सांगितले जात आहे.


 


टिप्पण्या
Popular posts
*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
दूध डेअरी बचाव कृती समितीच्या आंदोलनात सहभागी व्हा -- स्वप्निल जाधव
इमेज