*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन* 

*उदगीर नगर परिषदेच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन*


 


* उदगीर शहरातील विकास कामासाठी 3 कोटी 4 लाखाची तरतूद*


 


  लातूर/ उदगीर, दि. 27(जिमाका): उदगीर नगर परिषद अंतर्गत उदगीर शहरातील विविध विकास कामांचे उद्घाटन संसदीय कार्य, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते आज करण्यात आले.


     ही सर्व कामे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दलित वस्ती सुधार योजना, नागरी दलितेत्तर योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान (जिल्हास्तर) व स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी अंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहेत.


     उदगीर शहरामधील संमिश्र सोसायटी येथे पेव्हिंग ब्लॉक व नालीचे कामे करणे, येरमे नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व अशोक नगर येथे स्मशानभूमी विकसित करणे, शिवशक्ती नगर येथे रस्ता मजबुतीकरण व सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नाली करणे, खडकाळी गल्ली येथे सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करणे, तळवेस गल्ली व गांधी नगर येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता, रस्ता दुभाजक व नाली बांधकाम करणे, नालंदा नगर व बनशेळकी रोड येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे व येनकी मानकी रोड येथे सिमेंट कॉंक्रीट रस्ता व नालीचे बांधकाम करणे या सर्व कामांचे उद्घाटन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगर परिषदेच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहरी बेघर निवारा येथे भेट देऊन तेथील बेघर बांधवांसोबत चर्चा करून निवाऱ्याचे कौतुक ही त्यांनी केले. 


      उपरोक्त नमूद कामासाठी एकूण तीन कोटी चार लाख रुपये इतकी अंदाजपत्रकीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. 


             या भूमिपूजन समारंभासाठी उदगीर नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी भारत राठोड, बांधकाम सभापती मंजूरखां पठाण, बस्वराज पाटील नागराळकर, पंचायत समिती सभापती शिवाजीराव मुळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते.


               *********


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image