नगरसेवक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीर भोसले : जिल्हा संघटकपदी गणेश गायकवाड

नगरसेवक परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुधीर भोसले


जिल्हा संघटकपदी गणेश गायकवाड


उदगीर : नगरसेवक परिषद मुबंई या संघटनेच्या लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी उदगीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले यांची तर जिल्हा संघटकपदी नगरसेवक गणेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.


राज्यातील नगरसेवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नगर परिषद मुंबई ही राज्य पातळीवर काम करणारी संघटना असून या परिषदेचे अध्यक्ष राम जगदाळे व सरचिटणीस कैलास गोरे पाटील यांनी या संघटनेच्या लातूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. यात लातूर जिल्हा उपाध्यक्ष पदी उदगीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले तर जिल्हा संघटकपदी नगरसेवक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली. भविष्यात नगरसेवकाच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे भोसले व गायकवाड यांनी सांगितले.


सुधीर भोसले व गणेश गायकवाड यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.