सुशांत व कंगनाचे कवित्व पुरे करा...

सुशांत व कंगनाचे कवित्व पुरे करा...


गेल्या सहा महिन्यापासून केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश


कोरोना नावाच्या विषाणूच्या दहशतीखाली जगत आहे. कोरोनाने


सर्वत्र इतके मोठे थैमान घातले आहे की, प्रत्येक माणूस हा भीतीतूनच


जगत असताना दिसतो आहे. केारोना आरोग्याचे प्रश्न तर गंभ्रीर


निर्माण केले आहेत. मात्र त्याहून अधिक गंभीर प्रश्न यामुळे उद्भवलेल्या


परिस्थितीतून निर्माण झाले आहेत. आज सामान्य माणसाला जगावे


कसे हा प्रश्न पडला आहे. गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊन


चालू असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. देशाची आर्थिक


व्यवस्था केालमडून पडली आहे. अनेकांच्या हातचे रोजगार गेल्यामुळे


खाण्यापिण्याचे वांदे निर्माण झाले आहेत. मेाठ¬ा शहरात कामाला


गेलेली मंडळी हातची कामे गेल्यामुळे गावाकडे येऊन बसली आहे.


गावात हाताला काम नसल्याने व्यसनाचेही प्रमाण वाढले आहे.


सामान्य माणूस कोरोनाच्या दबावाखाली दडपून चालला आहे. रोज


कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. रोज मृत्यूचा दरही


वाढत चालला आहे. अशा परिस्थितीतच पुन्हा निसर्गही शेतक-यांवर


कोपलेला दिसत आहे. मागच्या चार पाच दिवसापासून मुसळधार


पाऊस सुरू झाला आहे. या पावसात अनेकांची घरे पडून वाहून गेली


आहेत. शेतक-यांच्या शेतात हाताला आलेले पीक वाहून गेले आहे.


शेतक-यांच्या डोळ्यात हसू फुलण्याऐवजी आसू आलेले आहेत. अशी


एवढी भयानक परिस्थिती राज्यात निर्माण झालेली असताना या


विषयावर आपले लक्ष केंद्रीत करणे हे काम राज्य सरकार व सरकारच्या


विरोधी पक्षाचे आहे. मात्र या सर्व समस्यांकडे सोयीस्करपणे कानाडेाळा


करून मयत अभिनेता सुशांतसिंह व ट्वीटकार अभिनेत्री कंगना


रानावत या दोंघांच्याच भोवती राज्यकर्ते फिरताना दिसत आहेत.


राज्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थिती


सामान्य माणसाला, शेतक-यांला शेतमजूराला दिलासा देण्याची ही


वेळ आहे. बॉलीवूडमुळे सामान्य जनतेचे दु:ख पुसले जाणार नाही हे


राज्यकत्र्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मागच्या काही महिन्यापूर्वी आत्महत्या


की हत्या याचा शोध लागेल तेव्हा लागेल मात्र मयत झालेल्या


सुशांतसिंह प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये वाकयुध्द सुरू


आहे. त्यातच ते प्रकरण राज्य सरकारकडून सीबीआयकडे दिले


जावे असा आग्रह विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून करण्यात येत


हेाता. तर दुसरी सत्ताधा-यांनी राज्यातील पोलीस सक्षमपणे काम


करीत असताना सीबीआयची मागणी का असा सवाल करीत होती.


त्यातच न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग


करण्यात आले. दुसरीकडे अभिनेत्री कंगना राणावत हिने गेल्या काही


दिवसापासून ट्विटवार सुरू केले आहे. महाराष्ट्रातील राज्यकत्र्यांवर


आपल्या ट्वीटमधून वेळोवेळी टीकास्त्र सोडण्याचा कार्यक्रम सुरू


केला आहे. राज्यकत्र्यांनी राज्यासमोर इतके भीषण प्रश्न असताना


अशा लोकांकडे दूर्लक्ष्य करून आपली समाजातील प्रतिमा उजळ


करण्याकडे प्राधान्य देणे गरजेचे असते. मात्र राज्यातील सत्ताधारी


शिवसेनेला ते जमले नाही. शिवसेनेने कंगणा रानावतच्या विरोधात


आक्रमक भूमिका घेतली. तर विरोधी पक्षाकडून रानावतचे समर्थन


सुरू झाले. माध्यमांवर देखील याच घटनांचे वार्तांकन मोठ¬ा प्रमाणात


येऊ लागल्याने सामान्य माणसामंध्ये मात्र सरकारबद्दल व विरोधी


पक्षांबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. कंगना बॉलीवूडबद्दल काय म्हणजे


बॉलीवूडमधील तिचे विरोधक तिला काय उत्तर देतात याच्याशी


सामन्य माणसाला काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यांना त्यांच्यासमोर


आ वासून उभा असलेला पोटाचा प्रश्न कसा सुटेल याचे कोडे


पडलेले आहे. अशा परिस्थिती माध्यमांनी सामान्य माणसांचे प्रश्न


चव्हाट¬ावर आणणे गरजेचे आहेत. मात्र माध्यमे, राज्यकर्ते व विरोधक


यांच्याकडून केवळ सुशांतसिंह व कंगना रानावत यांच्यावरच चर्चा


होत आहे. हे सामान्य माणसासाठी हितावह नाही. त्यामुळे आता


सुशांतसिंह व कंगनाचे कवित्व बास करा असे म्हणण्याची वेळ


सामान्य माणसावर आली आहे.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज