लॉयनेस क्लबच्या वतीने कायदेविषयक शिबिर संपन्न


उदगीर: येथील लॉयनेस क्लबच्या वतीने महिलांसाठी कायदेविषयक शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन रुपाताई पटवारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऍड. शिवाजी कोकणे, ऍड. महेश मळगे, लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा चंद्रकला बिरादार, लाय.सचिव सुनीता पंडित, राजकुमार बिरादार बामणीकर, उपस्थित होते. 


यावेळी ऍड. कोकणे यांनी ग्राहक संरक्षण कायद्या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तर ऍड. महेश मळगे यांनी महिलांना संरक्षण देणाऱ्या अनेक कायद्यांची माहिती दिली. कायदे जरी महिलांच्या बाजूने असले तरी या कायद्याचा महिलांनी स्वरक्षणार्थ फायदा घ्यावा मात्र गैरफायदा घेऊ नये असे आवाहन यावेळी ऍड. मळगे यांनी केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाय.प्रेमलता नळगिरे यांनी केले तर आभार लाय.मीनाक्षी स्वामी यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाय.अनिता नेमताबादे,लाय.बेबीसरोज बेलुरे, लाय.सुषमा मुळे, ऋतुजा पंडित, यांनी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज