होळीकर सरांना डोळ्यासमोर ठेवले तर यश निश्चित.  -- बसवराज पाटील नागराळकर .

होळीकर सरांना डोळ्यासमोर ठेवले तर यश निश्चित.  -- बसवराज पाटील नागराळकर .


      [    ] आपण कोणीही देव पाहीला नाही पण एक परिपूर्ण माणूस मात्र देव असू शकतो जो आपल्याला जगण्याचे शास्त्र देऊ शकतो असा देव माणूस म्हणजेच दि.लिं.होळीकर गुरुजी होते.  ते  मितभाषी होते पण त्यांचं बोलणं कामातून होतं. त्यांनी कधी कुणाची अडचण केली नाही तर सतत इतरांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतः पुढे यायचे. जातीयता संपवण्यासाठी ची धडपड, नीतिमत्ता पूर्ण वागणे - जगणे हेच त्यांचे वैयक्तिक जीवन होते.अशा या होळीकर  गुरुजींना डोळ्यासमोर ठेवून आपण आपली वाटचाल केली तर आयुष्यात यश निश्चित प्राप्त होते असे मत मा. बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले.


      [    ] उदगीरभूषण रमेश आंबरखाने यांचे अध्यक्षतेखाली कै.दि.लिं.होळीकर प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानाचे ७ वे पुष्प प्रसिद्ध वक्ते तथा रा.काॕ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी मी अनुभवलेले होळीकर गुरूजी या विषयावर आपले विचार व्यक्त करुन गुंफले . सर्वप्रथम  दि.लिं.होळीकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यत आले.या वेळी नागराळकर म्हणाले की,कुठल्याही ज्ञानपिठाच्या पलिकडचे ज्ञानपीठ म्हणजे होळीकर गुरूजी होते. ते श्रमप्रतिष्ठेला खुप महत्त्व द्यायचे , शाळा, विद्यार्थी अथवा शिक्षकांमुळे जर कुणाचे नुकसान झाले तर ते स्वतः त्यास मदत करायचे. ते विद्यार्थ्याचे मित्र बनायचे प्रसंगी कठिणही व्हायचे . त्यांची शरीर यष्ठी, सततचा हासरा चेहरा, वेळेचे पालन आणि शिस्तबद्धता यामुळे त्यांचा नैतिक दबदबा होता. असे गुरुजी लाभने आम्हा विद्यार्थ्यांचे भाग्यच. अशा अनेक आठवणींना वाट मोकळी करुन उपस्थितांसमोर साक्षात होळीकर गुरूजींना उभे केले .


      [   ] होळीकर गुरूजींच्या स्मृतीप्रित्यार्थ दर वर्षी दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार  या वर्षी शिवशंकर पाटील,केंद्रप्रमुख कोदळी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपुर्वक बहाल करण्यात आला तर  समाजसेवक सुरेश लांडगे यांची आखिल विश्व वारकरी परिषदेच्या उदगीर तालुका आध्यक्ष पदी निवड झाल्याबद्द यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी रामभाऊ जाधव यांचे वतीने प्रत्येक वर्षी दिला जाणारा दि.लिं. होळीकर स्मृती विद्यार्थी पुरस्कार यावर्षी शाळेतुन प्रथम आलेली कु.अदिती उमाकांत गायकवाड , द्वीतीय आलेला रोहित भिमराव कांबळे तर तृतीय आलेली कु.नेहा विठ्ठलराव बेळकुंदे हिस रोख रक्कम,सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र ,शाल हार व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यत आला.यावेळी ॲड.राजेंद्र मुळे , सत्कारमुर्ती रमेश लांडगे, शिवशंकर पाटील आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी उदगीरभूषण रमेश आंबरखाने यांनी यथोचित अध्यक्षीय समारोप केला.


     [   ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांसमोर आणि फेसबुक व युट्युब लाईव्ह संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे संचलन उपाध्यक्ष अनंत कदम यांनी केले, उषाताई तोंडचिरकर यांनी स्वागत गीताने स्वागत केले. प्रास्तविक डाॕ.दत्ताहरी होनराव यांनी मांडले. सत्कारमुर्तीचा परिचय यशवंतराव बिरादार यांनी करुन दिला तर आभार प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी मानले.यशस्वीततेसाठी निवृती रायवाड, सुनिल. येणकीकर , उमाकांत वल्लापुरे आणि सुजित पाटील येणकीकर  आदिंनी परिश्रम घेतले.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही