महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी संजय शिंदे

महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी संजय शिंदे


उदगीर: सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांची महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेसच्या लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.


सदरील नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे प्रदेशअध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंञी तथा सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, महाराष्ट्र राज्याचे वैधकिय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमितभैय्या देशमुख, आ.धीरजभैय्या देशमुख, लातूर जिल्हा कांग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेसचे प्रदेशअध्यक्ष मोहम्मद बदरूज्जमा यांनी केली आहे. संजय शिंदे यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


संजय शिंदे हे गत वीस वर्षांपासून असंगठित कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात. त्यांच्या या कार्यांची व एकनिष्ठेची दखल घेऊन माजीमंत्री तथा सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख, वैधकिय शिक्षणमंत्री तथा पालकमंञी अमितभैय्या देशमुख, आ.धीरजभैय्या देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाअध्यक्ष तथा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.चे व्हाईस चेअरमन श्रीशैलदादा उटगे यांनी केली आहे. या निवडीबद्दल संजय शिंदे म्हणाले की, भारतीय कांग्रेस पक्षाने व आमचे मार्गदर्शक तथा माजीमंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमितभैय्या विलासराव देशमुख, आ.धीरजभैय्या विलासराव देशमुख, भारतीय कांग्रेस कमिटीचे लातूर जिल्हाअध्यक्ष श्रीशैलदादा उटगे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून माझी महाराष्ट्र प्रदेश असंगठित कामगार कांग्रेस लातूर ग्रामीण जिल्हाअध्यक्षपदी निवड केली. या निवडीने असंगठित कामगारांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी व कांग्रेस पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी एकनिष्ठेतेने कार्य करित कांग्रेस पक्ष संघटन बळकट करण्याकरिता कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


टिप्पण्या
Popular posts
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने मोफत मास्क वाटप उदगीर(प्रतिनिधी) वेळोवेळी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यातअग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ उदगीर सेट्रलच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून भाजी विक्रेत्यांना व बारा महिने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोणा आजाराच्या पार्श्वभूमीवर आजाराचा वाढता प्रभाव लक्षात घेता जिल्हा परिषद मैदानावरील भाजीविक्रेते व शहर पोलीस ठाणे येथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मोफत मास्क वाटप करण्यात आले.यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष प्राचार्य डॉ दत्ता पाटील, रो. विशाल जैन, रो. प्राचार्य व्ही.एस कणसे, रो. प्रशांत मांगुळकर, रो. रवी हासरगुंडे, रो. विजयकुमार पारसेवार इ.रोटरीचे पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
आज उदगीरच्या 20 व्यक्तीची स्वॅब तपासणी 19 निगेटीव्ह एकाचा अहवाल पॉझिटिव्ह
उदगीरात फूटबॉल स्पर्धेचे उद्घाटन उदगीर : येथील कै. संभाजी पाटील प्रतिष्ठान व हॉनेस्ट ग्रुप उदगीर च्या वतीने उदगीर फुटबॉल लीग ऑल इंडिया या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मुख्याधिकारी भारत राठोड यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटूरे, महेश भंडे, रोटरी क्लबच्या सचिव मंगला विश्वनाथे, नगरसेवक फैयाज शेख, संतोष फुलारी, विशाल तोंडचिरकर, देविदास पाटील, सलीम परकोटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याधिकारी भारत राठोड यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळण्याचे आवाहन करीत यश मिळविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून खेळल्यास यश निश्चितच मिळेल असे मत व्यक्त केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी खेळाचे वातावरण टिकण्यासाठी असे खेळ आवश्यक असल्याचे सांगत उदगीरच्या मातीने अनेक मोठे खेळाडू दिले असल्याचे सांगितले. या स्पर्धा तीन दिवस चालणार असून या स्पर्धेसाठी देविदास पाटील, इफतेखार शेख, परवेज कादरी, इस्माईल शेख, बहोद्दीन जहागीरदार, इब्राहिम कुरेशी, आसिफ फारुखी, याकूब पटेल, इमाम हासमी, खाज चौधरी, उबेड हाश्मी, डायमी मुजाहेड , बयाज शेख हे पुढाकार घेत आहेत.
इमेज
उदगीर शहरात ८ ते १२ मार्च दरम्यान 'महादंगल' : ना.संजय बनसोडे यांची माहिती
इमेज