कृषी विधेयकाद्वारे मोदी सरकारचे धाडसी पाऊल- प्रा. डॉ. शेषराव मोहिते

कृषी विधेयकाद्वारे मोदी सरकारचे धाडसी पाऊल- प्रा. डॉ. शेषराव मोहिते


 


निलंगा : सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या बाबतीत मागच्या 70 वर्षांपासून आपल्या देशात चुकीचे धोरण अवलंबण्यात आले.व्यापारी व दलाल हे शेतकर्‍यांचे शत्रू असल्याचे भासविण्यात आले. परंतु, सरकारचे धोरणे हेच खरे शेतकर्‍यांचे शत्रू असून दिल्लीत बसून शतमालाचे भाव पाडले जातात.मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकात शेतकर्‍यांना स्वातंत्र्य देण्याचे काम केले आहे. मोदी सरकारचे हे धाडस पाऊल असल्याचे मत प्रा.डॉ. शेषराव मोहिते यांनी व्यक्त केले.


निलंगा येथील वृंदावन मंगल कार्यालयात  भाजपच्या वतीने कृषी विधेयक- 2020 बाबत परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रा.मोहिते बोलत होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी गोविंदराव पाटील होते. व्यासपीठावर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित होते. 


प्रा.मोहिते म्हणाले, कषी विधेयकामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार, हमीभाव मिळणार नाही, बाजार समितींचे अस्तित्व धोक्यात येईल या अफवा चुकीच्या आहेत.शेतकर्‍यांना आपला शेतमाल कोणत्याही बाजारात विक्री करता येणार आहे.त्याचबरोबर कॉन्टॅक्ट फार्मिंगमुळे शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार आहे.या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने कांही वस्तू जीवनावश्यक वस्तूत बाहेर काढले आहे. त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळणार आहे. फक्त सरकारने निर्यात बंदी लागू नये व आयात धोरण अवलंबू नये असे सांगत या विधेयकावर सरकारने ठाम रहावे असे आवाहनही त्यांनी केले. मागच्या काळात शेतकर्‍यांना दिली जाणारी मदत शेतकर्यांपर्यंत पोहोचत नव्हती. पण आता थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर रूपये जमा होत असल्याने यात मोठी पारदर्शकता आणण्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त केले.


याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, पंचायत समिती अध्यक्षा राधाबाई बिराजदार,  संजय दोरवे, बजरंग जाधव, रामभाऊ तिरूके, धोंडीराम बिराजदार, अजित माने, चेअरमन दगडू सोळुंके,  बापू साहेब राठोड, तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, तानाजी बिरादार, शाहुराज पाटील, ज्ञानेश्वर बरमदे, ज्ञानेश्वर जावळे, कुमोद लोभे, राजा पाटील, निटूरचे उपसरपंच संगमेश्वर करंजे आदीसह शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.


*विधेयकाचे विरोधकांकडून राजकारण- युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर*


परिसंवादात कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, केंद्र सरकारने आणलेले नवे कषी विधेयक शेतकर्‍यांच्या जीवनात अमुलाग्र बद्दल घडविणारे आहे. शेतकर्‍यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असताना विरोधकांकडून फक्त राजकारणासाठी विरोध होत आहे.हे विधेयक आम्ही आणू असे काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात म्हटले होते.आज तेच विरोध करत आहेत. कृषी विधेयकाची माहिती येणार्‍या काळात प्रत्येक गावावस्ती तांड्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.