18 वी ओव्हर 

18 वी ओव्हर


 


दिनांक 27 सप्टेंबर 2020, स्थळ वाळवंटातील शारजाह, वेळ रात्री 10 30 नंतर कुठली तरी.....निमित्त किंग्स एलेवंन पंजाब विरुद राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान खेळला गेलेला क्रिकेट सामना...बैट्समन राहुल तेवतीया....मागील एक तासापासुन चाचपडत खेळणारा...कधी आत्मविश्वास कमी तर कधी टाइमिंग चुकायचे...पुर्ण प्रयत्न करुनही कधी नशीब साथ देत नव्हते , इतकेच काय एखादा चेंडू अगदी पुर्ण कौशल्य पणाला लावून मारला तरी क्षेत्ररक्षक अचुक पकडत असे, समलोचंक पूरेपर टिका करताना म्हणाले की राहुल परत का येत नाही, त्याच्या कुर्मगती खेळामुळे राजस्थान रोयल्स संघ सामना गमावणार आहे, सोशल मीडिया वर प्रचंड टर उडविली जात होती, आव्हान प्रत्येक चेंडू गणिक अधिक अशक्यप्राय होत चालले होते,


प्रचंड मानसिक दबावाखाली राहुल पोहचला होता आणि आता शेवटच्या 3 ओव्हर मधे 50 धावा करायच्या होत्या......म्हणजे 18 चेंडू आणि आणि 51 धावा करायच्या आहेत....समालोचकानी किंग्स एलेवन पंजाब ला अगदी विजयी घोषीत केलेले...


राहुल तेवतीया....पहिल्या 19 चेंडूत केवळ 8 धावा केलेल्या...सर्वांच्या टीकेचा धनी ठरलेला...चाचपडत खेळणारा अगदी असे वाटावे की कॉलनीतील एखादा तेंडुलकर यापेक्षा चांगला खेळतो इथ पर्यंत टिका....


आणि 18 वी ओव्हर घेउन वेस्ट इंडिज चा गोलंदाज क्वाट्रेल डाव्या हाताने मारा करायला आला आणि राहुल सुद्धा डाव्या हाताने उजवी खेळी करुन गेला....पहिल्या चार चेंडूवर चार षटकारांची बरसात...स्क्वैयर लेग वरुन..लॉंग ऑफ़...लॉंग ऑन...आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा एक षटकार.....6 चेंडूत तब्बल 30 धावा....पहिल्या 8 धावासाठी 19 चेंडू घेणारा राहुलला मात्र पुढच्या 30 धावासाठी केवळ 6 चेंडू पुरेसे होतात, .....हातातुन गेलेला सामना सहज जिंकला जातो ...आणि टीकेचा शिरोमणी ठरलेला रोहित कौतुकाच्या वर्षावात न्हाऊन निघतो.......


आयुष्यात काय वेगळे असते या शिवाय...


कधी सामान्य यश मिळवायला खुप जगडावे लागते....मात्र हे जगडणे तुम्हाला नकळ्त स्थिर आणि मजबूत करत असते, राहुल पहिले 19 चेंडू खेळला, जरी चाचपडला तरीही त्या चेंडू खेळल्याने तो खेळपट्टीवर स्थिरावला, त्याचा आत्मविश्वास दुणावला, आणि सह्याद्री एवढा जरी दबाव होता तरी त्याची सकारात्मक मनोवृत्ती हिमालय इतकी मोठी ठरली,


प्रत्येकाला परमेश्वर 18 वी ओव्हर खेळायला देतच असतो मात्र त्यासाठी टीकेचे, अपमानाचे,अविरत प्रयत्नाचे, निराशेचे , प्रतिकूल परिस्थीतीचे, अपयशाचे, अवहेलनेचे , वेदनेचे, कधी कधी स्वकीयांचे टिपणीचे, अपेक्षाभंगाचे, विश्वासघाताचे, अनपेक्षित संकटांचे 19 चेंडू अत्यंत सकारात्मक वृत्तीने आणि प्रचंड आत्मविश्वासाने स्वतची विकेट अजिबात पडू न देता ( सेल्फ विकेट चा अजिबात विचार न करता) खेळून काढावे लागतात कारण हे 19 चेंडू तुम्हाला इतके सक्षम बनवतात की कुणीही 18 वी ओव्हर घेवुन आला तरी तुम्ही राहुल तेवतीयाच असतात आणि विजयाचे श्रेय तुमचे कुणीही हिरावून घेवू शकत नाही 


.....कोविडचा हाहाकार, आर्थिक मंदी , नितीमूल्यांची जालेली होळी, दुरावलेले नाते संबंध, सामाजिक जीवनात पसरलेले नैराश्य,


निसर्ग वादळे , जाती धर्माच्या दुर्दैवाने उभारल्या गेलेल्या भिंती, प्रचंड महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे वाजलेले तिन तेरा आणि वैद्यकीय संस्थांच्या उघड्या पडलेल्या मर्यादा, माणुसकीच्या पलिकडे गेलेल्या राजकीय महत्वकाक्षा, शासकीय संस्था कडून होणारी प्रचंड दफ्तर दिरंगाई, कोसळत असनारय इमारती आणि बळी पडणारे निरपराध नागरीक, हे सर्व ते 19 चेंडू आहेत आणि आपल्याला ते अत्यंत संयमाने खेळून काढायचे आहेत,कुठल्याही परिस्थीतीत आणि ते सुद्धा स्वतची विकेट अबाधित ठेवूनच, हे दुख माज्याच नशिबी का,हा चेंडू माज्याच नशिबी का ही तक्रार तर अजिबात नकोय कारण तो चेंडू त्या 19 चेंडूचा भाग आहे हे परवाच राहुलने आपल्याला दाखवुन दिले आहे. सेलिब्रेशन करायचे आहे न, जिंकल्याचा आनंद घ्यायचा आहे न, मिरवायला आवडते न तुम्हाला विजय मिळाल्यावर आपल्या प्रिय जनांना घेवुन....मग कसल्याही परिस्थीतीचं टेंशन न घेता अत्यंत सहज पने हे चेंडू खेळून काढा कारण ईश्वरं तुमची वाट बघतोय 18 वी ओव्हर घेवुन, तुम्हाला जीवनाचा चषक उंचावताना बघायचे आहे 


मला या प्रसंगी राजकुमारचा एक संवाद आठवतोय, तो म्हणतो 


" जानी, हम तुम्हे मारेगे और जरुर मारेगे,


लेकीन वो जगह भी हमारी होगी 


बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी, लेकीन हमे सही वक्त का इंतजार होता है तबतक तूम जीतनी उछलकूद कर सकते हो वो कर लो....


 


प्रा.प्रशांत सी. जोशी 


An ISO Consultant 


औरंगाबाद 9822431780


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही