उदगीरात तहसीलची निजामकालीन इमारत झाली नामशेष: 1980 पासून आजपर्यंत 28 तहसीलदारांनी या इमारतीमधून हाकला कारभार:  व्यंकटेश मुंडे शेवटचे तहसीलदार उदगीर (विक्रम हलकीकर) :

उदगीरात तहसीलची निजामकालीन इमारत झाली नामशेष:


1980 पासून आजपर्यंत 28 तहसीलदारांनी या इमारतीमधून हाकला कारभार: 


व्यंकटेश मुंडे शेवटचे तहसीलदार


उदगीर (विक्रम हलकीकर) : उदगीर शहरात तहसील कार्यालयाची नूतन वास्तू उभारण्यात येणार असल्याने निजामकाळात बांधलेली इमारत पाडून नामशेष करण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार 1980 पासून आजपर्यंत 28 तहसीलदार महोदयांनी या रुबाबदार इमारतीमधून आपला कारभार हाकला आहे. नुकतेच बदली झालेले व्यंकटेश मुंडे हे जुन्या इमारतीत तालुक्याचा कारभार पाहणारे शेवटचे तहसीलदार आहेत.


स्वातंत्र्यपूर्व काळापासून उदगीर हे तालुक्याचे शहर आहे. पूर्वी निजाम राजवटीत असलेले हे शहर स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात सुरुवातीला उस्मानाबाद जिल्हा त्यानंतर लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्याचा समावेश झाला. निजाम राजवटीमध्ये तालुक्यातील महसूल विभागाचा कारभार पाहण्यासाठी तहसील कार्यालयाची भव्य दिव्य अशी इमारत 1934 साली उभारण्यात आली होती. यापूर्वी उदगीर हा उदगीरसह सध्याचा जळकोट व देवणी या तीन तालुक्याचा तालुका म्हणून ओळखला जात होता. आज घडीला उदगीर तालुक्यातील 87 gram 99 गावाचा कारभार येथील तहसील कार्यालयातून पाहिला जातो. एक तहसीलदार, चार नायब तहसीलदार, 8 मंडळ अधिकारी व 40 तलाठी यांच्यासह कर्मचारी वर्ग उदगीर तालुक्याचा महसूल कारभार हाकतो आहे. आजपर्यंत या तहसील कार्यालयाच्या इमारतीमधून तहसीलदारांनी आपला कारभार हाकला असून नुकतेच बदली झालेले व्यंकटेश मुंडे हे जुन्या इमारतीमधून कारभार पाहणारे शेवटचे तहसीलदार ठरले आहेत.


• निजामकाळात बांधण्यात आलेली उदगीर तहसील कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने ही इमारत नवीन बांधावी असा प्रस्ताव मागच्या काळात तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांनी राज्यशासनाकडे पाठवून मंजुरी मिळवून घेतली होती. नंतरच्या काळात निवडणुका होऊन राज्यात सत्तांतर झाले व उदगीर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे आमदार म्हणून निवडून आले. त्यातच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांची राज्यमंत्री म्हणून निवड झाली. तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या प्रस्तावाला गती देऊन ना. बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून घेतला. त्यांनतर सदरील इमारतीच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचा दृष्टीने हलचाली सुरू झाल्या. उदगीर येथे भव्य दिव्य तहसील कार्यालयाची इमारत उभारणार असून त्यासाठी काही कालावधीकरिता हे तहसील कार्यालय देगलूर रोड वरील आय. टी. आय. परिसरात हलविण्यात आले आहे. जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे पाडापाडीचे काम पूर्ण झाले असून निजामकालीन ऐतिहासिक वास्तू यानिमित्ताने नामशेष झाली आहे.


 


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही