शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी


 उदगीर -शिवाजी महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शासनाने covid-19 चे नियम सांगितले आहेत या नियमाप्रमाणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सोशल डिस्टंसिंगचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपप्राचार्य डॉ.आर. एम. मांजरे आयक्वेशी, सेलचे प्रमुख प्रा.व्ही.एम.पवार, कार्यालयीन अधीक्षक श्री. बि.के. पाटील व अन्य कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला अभिवादन केले.प्राचार्य डॉ. विनायकराव जाधव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सूत्रसंचालन प्रा.व्ही. एम. पवार तर आभार बी.के.पाटील यांनी मानले.