नीट 2020 परीक्षेत उदगीर येथील अभय अशोक चिल्लरगे 705 गुण मिळवून राज्यात दुसरा

नीट 2020 परीक्षेत उदगीर येथील अभय अशोक चिल्लरगे 705 गुण मिळवून राज्यात दुसरा


उदगीर (जि.लातूर)-नीट 2020 परीक्षेत उदगीर येथील अभय अशोक चिल्लरगे( राजर्षी शाहू महाविद्यालय) याने 705 गुण मिळवून राज्यात दुसरा आला आहे.जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या अभयला ट्रक चालक असलेल्या त्याच्या वडिलांनी सदैव मोठ्या कॉलेजात शिक असा मोलाचा सल्ला दिला. तो सार्थ ठरवत त्यानं हे यश मिळवलं.अतिशय सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या उदगीर येथील चिल्लरगे कुटुंबातील अभय सर्वात लहान मुलगा.एकूण 4 भावंडं असलेल्या कुटुंबातील शालेय जीवनापासून हुशार असलेल्या अभयनं दहावीत 96 टक्के गुण मिळवत शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळवला.अकरावी विज्ञान वर्गाच्या सुरुवातीपासूनच त्यानं कठोर परिश्रम केले.आता पहिलं ध्येय सर्वोच्च एम्स संस्थेत प्रवेश मिळवणं व मेंदूविकारतज्ज्ञ व्हायचं आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचाही मानस आहे असंही त्यानं सांगितलं आहे. वीरशैव समाज उदगीर चे अध्यक्ष श्री चंद्रकांत वैजापुरे व सचिव बाबुराव पांढरे यांनी समाजाच्या वतीने कौतुक केले.


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज