उदगीर मतदारसंघातील
अनेक विकास कामे वर्षेभरात मार्गी -राज्यमंत्री संजय बनसोडे
---------------------
मतदार संघासाठी कोठयावधी रुपयांच्या प्रस्ताविक विकास कामासाठी भरीव निधी
-----------------------
लातूर: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेच्या वेळी राज्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. मागील एक वर्षात उदगीर व जळकोट शहराच्या विकासाला गती मिळाली असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले गेले आहेत. या शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही यापुढील काळात मराठवाडयात विकासाचे मॉडेल म्हणून पुढे येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
यावेळी बोलताना राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, मागील वर्षी उदगीर जळकोट येथील जनतेने मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. महाविकास आघाडीत राज्यमंत्री म्हणून काम करीत असताना एका वर्षातच शहराच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उदगीर शहरातील साहित्य प्रेमीसाठी संस्कृती भवन साठी 9 कोटी, लिंगायत भवन 2 कोटी, शादीखाना 2 कोटी, बौध्द विहार 2 कोटी ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा साठी 12.50 कोटी,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत उदगीर जळकोट तालुक्यात 4.75 कोटी, देवर्जन-दावणगाव रस्ता 2 कोटी, हाळी-डिग्रज 03 कोटी ,गुडसुर -घोसी 4.50 कोटी ,येणकी-माणकी रस्ता 08 कोटी ,जळकोट येथे नवीन विश्रामगृह बांधकाम 5.45 कोटी जळकोट प्रशासकीय इमारत 14.99 कोटी. उदगीर विश्रामगृह विस्तारीकरण 3.77 कोटी उदगीर प्रशासकीय इमारत 14.99 कोटी
तसेच उदगीर ट्रामा केअर युनिट दुसरा टप्पा 2.77 कोटी उदगीर सामान्य रुग्णालयात अद्ययावत आँक्सिजन टँक 70 लाख,जळकोट सामान्य रुग्णालय दुरुस्ती 32. लाख जळकोट रुग्णालयाकडे जाणारा रस्ता 50 लाख, उदगीर सामान्य रुग्णालयाकडे(धन्वंतरी महाविद्यालय) रस्ता 50 लाख यासोबतच अनेक वर्षी पासून प्रलंबित असलेली तहसील कार्यालय याची इमारत 9 कोटीची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अशा विविध अनेक विकास कामासाठी वर्षभरात निधी देऊन कामे मार्गी लावले आहेत.या कामाना प्रशासकीय मान्यता मिळाली असुन या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे . या सोबतच उदगीर येथील नियोजित एमआयडीसीचा प्रस्ताव उच्चसतरीय समिती समोर दाखल केला आहे. लवकरच याला मान्यता मिळणार आहे याबाबतची अधिसूचना लवकरच प्राप्त होईल,अनेक वर्षी पासून प्रलंबित असलेला आष्टा मोड ते उदगीर रस्त्याचे काम सुरू झालेले आहेत. तसेच तिरु नदीवर बॅरेजसचा प्रस्तावाल तत्वाता मान्यता दिली आहे. आमदार फंडातून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल मघ्ये दहा अँबुलस देण्यात आले आहेत. मगरुळ येथे प्राथमिक आरोग्य क्रेंद्रस मान्यता, हत्ती बेटास पर्यटनाचा ब दर्जा, उदगीर येथील क्रिडा संकुलास 5 कोटी मंजूर ,जळकोट येथे क्रिडा संकुल मंजूर करण्यात आले अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा