कृषी विधेयक स्थगिती अध्यादेशाची उदगीरात भाजपाकडून होळी

 


 उदगीर : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाच्या समर्थनासाठी उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे आघाडी सरकारने काढलेल्या स्थगिती आदेशाची होळी करून महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर निदर्शने करण्यात आली.


कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकाची बाजू मांडण्यासाठी व शेतकरी हिताचा हा कायदा आहे हे पटवून देण्यासाठी, तसेच राष्ट्रपतिद्वारा स्वाक्षरी करून कायदा पारित झालेला असताना त्याला कोणतेही राज्य सरकार स्थगिती देऊ शकत नाही किंवा आव्हान देऊ शकत नाही, महाआघाडी सरकारने केंद्राच्या कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत स्थगिती आदेश काढून आपला करंटेपणा दाखवून दिलेला आहे त्यांना शेतक-यांच्या प्रति कोणतीही आस्था नसून या कृषी विधेयकामुळे शेतक-यांचे कल्याण होणार आहे. व नरेंद्र मोदी सरकार हे शेतकर्-यांचे सरकार म्हणून पुढे येणार असल्यामुळे राज्य सरकारने या विधेयकाला स्थगिती देण्यात आली असल्याचा आरोप करीत या स्थगिती आदेशाची होळी उदगीर शहर भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली.


या आंदोलनात माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे प्रदेश सचिव नागनाथ निडवदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, भगवान पाटील तळेगावकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब राठोड, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, भाजपाचे तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, शहर अध्यक्ष उदयसिंह ठाकुर पं. स.माजी उपसभापती रामदास भाई बेंबडे, पं.स.सदस्य सुभाष कांबळे, नगरसेवक मनोज दादा पुदाले, बापूराव येलमटे, अॅड दत्ता पाटील, राजकुमार मुक्कावार, नागेश अष्टुरे, पप्पू गायकवाड, आनंद बुंदे, जिल्हा सचिव साईनाथ चिमेगावे, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य उत्तर कलबुर्गे, शामला कारामुगे, मधुमती कनशेट्टे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मजगे, संजय पाटील,आनंद साबणे , युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल निडवदे,संतोष बडगे,रवींद्र बेद्रे देवीलाल कांबळे, प्रीतम, व्यंकट काकरे, सुरज हंद्रगुळे, आदींसह पक्ष पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


उदगीर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी आंदोलनाचे सर्व नियोजन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.


Popular posts
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image
सरदार वल्लभभाई पटेल शाळेत लॉयनेस क्लब गोल्डच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
Image
*माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी*
Image
स्त्रियांचा सन्मान करणारेच खरे शिवरायांचे अनुयायी : दिशा पिंकी शेख उदगीर : छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी म्हणवून घेणा-यांची संख्या कमी नाही परंतु स्त्रियांचा सन्मान करणारेच ख-या अर्थाने शिवरायांचे अनुयायी असू शकतात असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. उदगीर येथील सार्वजनीक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नगर परिषदेसमोरील प्रांगणात दिशा पिंकी शेख यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील अठरा पगड जातींना सोबत घेवून स्वराज्याचे स्वप्न पाहीले व ते पूर्ण केले. आज समाजात जाती जातीत, धर्माधर्मात भेद करणारी मंडळी वाढत आहे. जाती धर्माच्या पलीकउे जावून देशाच विचार करणाराच खरा देशभक्त असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार चालविताना आपल्या आईचा सन्मान करून समस्त स्त्री जातीचा सन्मान केला असल्याचे सांगितले. आज मात्र आपली आई, बहीण, मुलगी, पुरूषी वर्चस्वाखाली दबून छळली जात आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वरचेवरवाढत चालले आहे. महिलंाना अजूनही वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही अशी खंत व्यक्त करीत जोपर्यंत स्त्रीयांची वैचारिक गुलामगिरी संपणार नाही तोपर्यंत हा शिवरायाचा महाराष्ट्र होणार नाही असे शेख यावेळी म्हणाल्या. सार्वजनीक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दोन दिवस कलामहोत्सव पार पडले. या कलामहोत्सवात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वियज निटूरे व मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून नरेंद्र कठारे, नीता मोरे, काजोल मिरजगावे, संगीता नेत्रगावे, स्वप्नील पकोळे, सुनील कोळी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीता मोरे यांनी केले. पाहूण्यांचा परिचय अनिता यलमटे यांनी करून दिला.
Image