माजी आमदार सुधाकर भालेराव कोरोना बाधित लाईफ केअर येथे उपचारासाठी दाखल 

माजी आमदार सुधाकर भालेराव कोरोना बाधित लाईफ केअर येथे उपचारासाठी दाखल


उदगीर 


चेन्नई येथे हॉस्पिटल च्या कामासाठी गेले असता प्रवासात माजी आमदार सुधाकर भालेराव कोरोना बाधित झाले . कोरोना बाधित झाल्याचे लक्षात आल्या नंतर तातडीने उदगीर कडे निघाले , मुंबई येथे प्राथमिक तपासणी करुन ते सोमवारी रात्री उशिरा उदगीर येथिल लाईफ केअर मधे उपचारासाठी दाखल झाले आहेत , त्यांची प्रकृती ठिक असुन काळजी करण्याचे कारण नाही असे डॉ ज्ञान विकास यानी सांगितले आहे.


  डॉ शिवराज पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यानी लाईफ केअर च्या माध्यमातून आरोग्य मंदीर उभारले . एस बी क्युरेटीव्ह केअर च्या माध्यमातून कोरोनच्या काळात माजी आ भालेराव यानी जोखीम उचलून ते पुन्हा सुरु केले . यामुळे कोरोना सारख्या महामारित साडे पाचशे पेक्षा जास्त रुग्नावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत . 


श्री भालेराव चेन्नई येथे कोरोना बाधित झाले असता तेथे उपचार न घेता उदगीर या आपल्या मातृभूमी वर विश्वास ठेवून लाईफ केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मधेच उपचार घेण्याचे ठरविले. 


कोरोना बाधितानि योग्य आणि तातडीच्या उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटल मधे दाखल व्हावे . त्यांच्या उपचारासाठी येथिल डॉ ज्ञान विकास , डॉ शिवराज सुर्यवंशी , डॉ श्याम हिबाने , जनरल सर्जन डॉ किरण गायकवाड , 


डॉ मयुरी पुन्जेलवाड , डॉ श्रद्धा उजनकर , डॉ शेख मुद्स्सीर , डॉ अनिल तरवडे ,यांच्यासह अस्थिरोग तज्ञ डॉ पवन राजूरकर , नेत्र रोग तज्ञ डॉ रामेश्वर चामले ,डॉ पवन महाजन , कान नाक घसा तज्ञ डॉ मनोहर सुर्यवंशी , त्वचा रोग तज्ञ डॉ श्रीकांत फड , दंत रोग तज्ञ डॉ चैतन्या नलवाड , जनरल सर्जन डॉ किरण गायकवाड , डॉ आदित्य मरेवार आदी तज्ञ डॉक्टराच्या टीम सह न्यूरो सर्जन डॉ भास्कर केद्रे , युरोलॉजिस्ट डॉ अनिल मुद्दा या व्हिजिटर्स डॉक्टर सह संपुर्ण हॉस्पिटल रुग्ण सेवेसाठी तत्पर असल्याने रुग्णानी आजारला न घाबरता उपचार करुन घ्यावेत असे आवाहन सी एफ ओ अमोल भालेराव यानी केले आहे. 


------------------------------------------------------


साई बाबा , आणि उदागिर महाराजांची कृपा आणि सर्व जनतेच्या आशीर्वादाने लवकर कोरोना वर मात करुन आपल्या सेवेत येईन , असा विश्वास माजी आमदार सुधाकर भालेराव यानी व्यक्त केला आहे .