मुग , उडीद, सोयाबीन विक्री साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरु :-  भरत तुकाराम चामले

मुग , उडीद, सोयाबीन विक्री साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रीया सुरु :-  भरत तुकाराम चामले 


उदगीर :- येथील स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने नाफेड अंतर्गत मुग , उडीद, सोयाबीन खरेदी करण्यात येणार असून ही खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रकियेद्वारे नोंदणी चालू आहे. तरी उदगीर तालुक्यातील शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चअरमन तथा शेतकरी नेते भरत तुकाराम चामले यांनी केले आहे.


स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करणारे असून या संघाच्या माध्यामातून शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमीका आहे. या संघाच्या माध्यामातून नाफेड अंतर्गत शेतीमाल खरेदी प्रक्रिया वेळोवेळी राबविण्यात येते. सध्या मुग,उडीद,सोयाबीन खरेदीची प्रक्रीया चालू होणार आहे. यासाठी शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीनंतर क्रमानुसार शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी संघामार्फत केली जात आहे. तरी शेतकर्‍यांनी या योजनेअंतर्गत मुग,उडीद,सोयाबीन विक्री साठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करुन आपला माल संघाकडे विक्रीसाठी आणावा असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत तुकाराम चामले यांनी केले आहे.


 


 


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज