समर्थ विद्यालयात माता गौरव दिन साजरा.  एकुर्का रोड : ३४ वर्षापासून घातला जातो जागर. 


उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्व. मातोश्री सुंदराबाई चौधरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवारी माता गौरव दिन साजरा करण्यात आला. 


अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्व. मातोश्री सुंदराबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना प्राचार्य प्रमोद चौधरी म्हणाले की, माते विषयीचे प्रेम, महती शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनात रूजविले पाहिजेत. यासाठी सहशालेय उपक्रमात आम्ही हा दिवस गेल्या ३४ वर्षापासून अखंडितपणे चालूच ठेवला आहे. यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा दिवस विद्यार्थ्यांविना साजरा करण्यात आला. परंतू ऑनलाईन विद्यार्थ्यांना या दिनाचे महत्व सांगितले गेले. प्रास्ताविक प्रा. एन. आर. लांजे यांनी केले. सुत्रसंचलन रसूल पठाण यांनी तर आभार अमर जाधव यांनी मानले. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*