शेतकऱ्यांनी जोडधंदे करून उन्नती साधावी : गोविंदराव भोपणीकर

शेतकऱ्यांनी जोडधंदे करून उन्नती साधावी : गोविंदराव भोपणीकर


देवणी...... जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी चांगल्या पद्धतीने जगला पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे शेतीला पूरक असे जोड धंदे केले तर हा अर्थिक उन्नती चा एकमेव मार्ग असल्याचे मत गोविंदराव भोपणीकर यांनी गुरधाळ येथील शेतकरी यांना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.


गुरधाळ येथील शेतकरी शेतकरी यांनी शेततळ काढून शेती ओलिताखाली आणून भरघोस उत्पादन व शेतीला पूरक मछ व्यवसाय करीत असल्याचे कळताच गोविंदराव भोपणीकर यांनी त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेततळ्याची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले याचं व्यवसायाच्या संबंधित कुकुट पालन कोल्हापूर विभागात मोठ्या प्रमाणात केले जाते तश्या प्रकारे काही करता आले करा असेही भोपणीकर यांनी सांगितले.


गोविंदराव भोपणीकर हे शेतकऱ्यांविषयी दूरदृष्टी असणारे नेते आहेत त्यांना शेतकऱ्यांविषयी आत्मीयता आहे शेतकऱ्यांचा विकास तर संपूर्ण देशाचा विकास समजून शेतकरी याना आपणास मदत करता येईल काय म्हणून शेतीला लागणारे विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान युक्त अवजारे उपलब्ध करून देण्याचा आपला माणसं असून देवणीत ऍग्रो एजन्सी घेतली आहे ती लवकरच देवणी शहरात चालू होणार आहे तेव्हा तालुक्यातील शेतकरी यांना मोठ्या प्रमाणात यांचा फायदा होणार आहे त्यामुळे भोपणीकर हे शेतकऱ्यांविषयी दुरदृष्टी ठेवणारे नेते आहेत हे नक्की त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त केले जात आहे.