उदगीर.(दि2) येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात दि.1 व 2 ऑक्टोबर रोजी मराठवाडा पातळीवरील लाल बहाद्दूर शास्त्री ऑनलाइन आंतरशालेय वाद विवाद स्पर्धा संपन्न झाली.कोवीड प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा ऑनलाइन संपन्न झाली."या स्पर्धेमध्ये संपूर्ण मराठवाड्यातून 59 संघाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी 59 हजारांची पारितोषिके विविध गटात वितरीत केली गेली .
यामध्ये सांघिक बक्षीस फिरती ढाल व रोख पारितोषिक पटकविण्याचा मान गांधी विद्यालय कृषी सारथी परभणी यांनी मिळवला.तसेच या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान उदगीरच्या लालबहादुर शास्त्री विद्यालयची श्रेया पुल्लागोर,स्पर्धेत सर्वद्वितीय परभणीच्या गांधी विद्यालयाचा रोहित काचेकर , सर्वतृतीय पारितोषिक विभागून भेल सेकंडरी स्कूल परळीची पियुषा तेलंग व जय भवानी विद्या मंदिर औरंगाबादची खुशी निंम्बेकर यांनी मिळविले. त्यानंतर ग्रामीण मुलींतून सर्वप्रथम महात्मा गांधी विद्यालय केसरजवळगाची पटेल शिफा , सर्वद्वितीय जिजामाता विद्यालय,धर्मापुरी सरोजा फड , सर्वतृतीय श्रद्धा कुंभार (शिवाजी विद्यालय,घरणी), ग्रामीण मुलात सर्वप्रथम पटेल काशीम (महात्मा गांधी विद्यालय, केसरजवळगा), ग्रामीण मुलात सर्वद्वितीय रोहित कांबळे(शंकर माध्यमिक आश्रमशाळा,बोरताळा तांडा), ग्रामीण मुलात सर्वतृतीय प्रथमेश मिरकले (वडसिद्ध नागनाथ प्रा.आश्रम शाळा,वडवळ नागनाथ),शहरी मुलीत सर्वप्रथम श्रेया पुल्लागोर (लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालय,उदगीर), शहरी मुलीत सर्वद्वितीय 1)पियुषा तेलंग (भेल सेकंडरी इंग्लिश स्कूल,परळी)2) निंबेकर खुशी (जय भवानी विद्यामंदिर,औरंगाबाद),शहरी मुलीत सर्वतृतीय गौरी देशपांडे (खोलेश्वर माध्यमिक विद्यालय,अंबाजोगाई), शहरी मुलात सर्वप्रथम रोहित काचेकर(गांधी विद्यालय कृषी सारथी,परभणी), शहरी मुलात सर्वद्वितीय पार्थ भेंडेकर (विद्यानिकेतन शिवाजीनगर,गंगाखेड), शहरी मुलात सर्वतृतीय वैभव कुंडकर (सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय,माजलगाव) यांना प्राप्त झाली.
या समारोप व बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सुरेंद्र आलूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी दिलीप नावंदे , तसेच मधुकरराव वट्टमवार,शंकरराव लासूने, गिरीश वझलवार,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,परीक्षक प्रा,श्रीहरी वेदपाठक,डॉ. विठ्ठल गोरे, प्रा.बालाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मेहकरकर,स्वागत व परिचय सुप्रिया बुधे, स्पर्धेचा अहवालवाचन स्पर्धाप्रमुख निता मोरे व निकाल वाचन अनिता यलमटे यांनी केले.तर आभार स्पर्धासहप्रमुख श्रीपाद सन्मुखे यांनी मानले.
तसेच या कार्यक्रमाच्या तत्पूर्वी सकाळी लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली. महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा