माजी पं. स. सदस्य मुरलीधर अंचूळे यांचा सत्कार
निलंगा: येथील माजी पंचायत समिती सदस्य श्री. मुरलीधरजी अंचुळे यांच्या सजगतेमुळे आपल्या निलंग्यात निरागस बालिकांचे अपहरण टळले. त्यांनी दाखविलेल्या सतर्कतेबद्दल निलंगावासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
एका अज्ञात इसमाने दोन बालिकांना जेवणाचे आमिष दाखवून, घरी कोणी नसताना रिक्षात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. गावाबाहेरील धावत्या रिक्षात रडणाऱ्या लहान मुली पाहून, त्या मार्गाने आपल्या गावी निघालेल्या श्री. मुरलीधर अंचूळे यांना एकंदरीत प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी सदर इसमाची थांबवून चौकशी केली असता, त्याने पळ काढला. दोन्ही मुलींना पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुलींना त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे गुरुवारी दुपारी गुन्हेगारास पकडण्यात यश आले आहे.
मुरलीधर अंचूळे यांनी दाखविलेल्या या सतर्कटेबद्दल युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
समाजातील प्रत्येकाने मुरलीधर अंचूळे यांच्याप्रमाणे सजगता दाखवली तर महिलांवर, बालकांवर होणाऱ्या अत्याचारांना तात्काळ आळा बसेल अशी अपेक्षा अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा