लाईफ केअर येथे कोरोना रुग्नासाठी स्वतंत्र पन्नास ओक्सिजन बेडची सुविधा 

लाईफ केअर येथे कोरोना रुग्नासाठी स्वतंत्र पन्नास ओक्सिजन बेडची सुविधा


उदगीर : कोरोना रुग्नासाठी वाढती ओक्सिजन ची अत्यावशकता लक्षात घेवून लाईफ केअर हॉस्पिटल येथे स्वतंत्र ओक्सिजन पन्नास बेड ची सुविधा सुरु करण्यात आली असल्याचे चेअरमन सुधाकर भालेराव यांनी सांगितले .


कोरोना रुग्नासाठी सुरु करण्यात आलेल्या या स्वतंत्र वार्ड़ मधे ओक्सिजन सह सर्व अत्यावश्यक उपकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. 


या वार्ड़ मधिल रुग्नावर होत असलेले उपचार नातेवाईकांना बाहेरुन प्रत्यक्ष पहाता येतील अशी व्यवस्था निर्माण केली आहे. ज्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक याना समाधान मिळू शकणार आहे . कोरोना बाधित रुग्णाला जर अचानक ओक्सिजन ची गरज भासली तर त्याच बेड जवळ या बाबतची सुविधा असल्यामूळे रुग्णाला तातडीने ओक्सिजन पुरवठा केला जावू शकतो. 


यावेळी सी एफ ओ अमोल भालेराव , डॉ ज्ञान विकास , डॉ शिवराज सुर्यवंशी , मिलिंद घनपाठी , नोडल ऑफिसर प्रमोद भांगे , राजगोविंद कारभारी , किरण पाटील , रामराव कांबळे , माधव पाटील , परमेश्वर स्वामी , बशीर शेख यांच्यासह सर्व डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थीत होते.