शिरोळ (वां) अरोग्य उपकेंद्र  प्रसूती करण्यात जिल्हयात प्रथम  

शिरोळ (वां) अरोग्य उपकेंद्र 


प्रसूती करण्यात जिल्हयात प्रथम


 


लातूर :- शिरोळ (वांजरवाडा) ता. निलंगा येथील आरोग्य उपकेंद्राने प्रसूती करण्यात जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी मागील सहा महिन्यात शिरोळ उपकेंद्रात एकूण 58 प्रसूती यशस्वीपणे करण्यात आल्या असून यामध्ये प्रथम प्रसूती-23, दुसऱ्यांदा प्रसूती -22 व तीन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या 13 महिलांचा समावेश आहेअशी माहितीजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी दिली.


या उपकेंद्रात सरासरी साधारण 10 महिलांची प्रसूती उपकेंद्रात होत आहेत. तसेच 35 महिलांना पाळणा लांबवण्यासाठी पीपीआययुसीडी बसवण्यात आले आहे. या सर्व प्रसूती तेथील आरोग्य सेविका श्रीमती अरुणा राठोड व समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रतिभा येळकर यांनी केल्या असून प्रसूती दरम्यान महिलेस कन्यारत्न प्राप्त झाल्यास मातेला साडी चोळी व बाळास अंगडं टोपडं देऊन मुलींचे जन्माचे स्वागत केले जाते.


ग्रामीण भागात उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळत असल्याने ग्रामस्थांचा उपकेंद्रात सेवा घेणे कडे कल वाढत असून उपकेंद्राच्या कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. तसेच आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत असांसर्गिक आजार रक्तदाब, मधुमेह व कँन्सर सारख्या दुर्धर आजाराचे निदानव उपचार तसेच दररोज योग शिबिर घेऊन ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. या उपकेंद्रास वेळोवेळी भेटी दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.रोडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास कदम यांचेकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.


या आरोग्यसेवेबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल केंद्रे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती श्रीमती भारतबाई सोळूंके व जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सर्व कर्मचाऱ्याचे अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज