सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय..... भौतिक सुविधा संपन्न असलेली शाळेची इमारत...
कार्य करण्याची प्रेरणा...
माननीय श्री उमाकांतराव बुधे सर.
इसवी सन 1992 ला शाळेची स्थापना झाली परंतु मान्यता 1999 आली.शाळेची सुरुवात म्हणल्यानंतर अगदी काबाड कष्टातून किंवा अडचणीच्या काळातच होत असते.अगदी तसेच एका पडक्या वाड्यामध्ये आमची शाळा सुरू झाली.जणूकाही सावित्रीबाई फुले पुण्याच्या वाड्यामध्ये शाळा सुरू केली. अगदी तसेच आमची शाळा सुरू झाली. शेणाने सारवणे पत्रे ,दगडी खिल्पट अशा स्वरूपात शाळा भरली.शिक्षक मात्र आनंदाने उपेक्षित वस्तीमध्ये अपेक्षित बदल करायचा या उद्देशाने आपले कर्तव्य बजावत होते. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत गेली. तेथील विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागले. पालक पहिल्यांदा विद्यार्थी कामावर घेऊन जायचा. परंतु हळूहळू वर्गात पाठवून स्वतः कामाला निघून जावू लागला.
आणि अशा परिस्थितीत विद्यार्थी सुद्धा अतिशय चांगल्या वळणाला लागले. परंतु हळूहळू माणसाच्या अपेक्षा वाढतात त्यात चुकीचे काय आहे? आमच्या पालक वर्गाचा देखील असा अट्टहास होता की आता शाळेची इमारत झाली पाहिजे.शाळेला वीस वर्षे झाली परंतु अजून इमारत नाही म्हणून जुने पालक व नवे पालक आग्रह धरू लागले.
असाच एक पालक मेळावा आम्ही घेतला,त्यात सर्व शिक्षकांचे कौतुक पालकांनी केले .विद्यार्थ्यांचेही कौतुक केले .परंतु एका गोष्टीवर नाराजी व्यक्त करू लागले आणि जसे आई बाळा पुढे अगदी तसेच शिक्षकांकडे संस्थाचालक पुढे सर्व पालक हट्ट धरू लागले. आता शाळा आपली चांगली करा आपल्या मुलांना चांगली सुविधा असलेली इमारत द्या. आपल्या या विभागांमध्ये आपण एक चांगली शाळा बांधून काढून विद्यार्थ्यांना आनंद देऊ या.
अशी पालकांनी आपल्या भाषणांमध्येअपेक्षा व्यक्त केली. जसे काही ईश्वर तथास्तु म्हणावे... अगदी तशीच घटना घडली आणि शाळेच्या बांधकामाला सुरुवात झाली. एकेक वर्ग बांधणे सुरू झाले. आणि अशाप्रकारे संस्थेमधील मान्यवर पदाधिकारी, व सारे शिक्षक बांधवांच्या अथक परिश्रमाने बांधकाम सुरू झाले .सुसज्ज इमारत,ग्रंथालय,डिजिटल हॉल,संगणक कक्ष,मिनरल वॉटर, ई. झाले. तीन ते चार वर्षात अगदी सुंदर इमारत तयार झाली,येणारे -जाणारे प्रत्येक जण इमारत पाहून आनंद जाऊ लागले अरे वा किती सुंदर शाळा बांधली! असे प्रत्येकाच्या तोंडून उदगार येऊ लागले.
शाळा पूर्ण झाली परंतु वर्ग वाढले , विद्यार्थी संख्या चांगली असल्यामुळे आणखी वर्ग बांधण्याचे संस्थेने निर्णय घेतला. आणि तेही त्यापेक्षा सुंदर वर्ग बांधावे असे ठरवले. आता शाळेचा कळस होणार आहे असे सर्वांना वाटू लागले आणि या कळसाचे मानकरी माननीय श्री उमाकांत बुधे सर, आता बांधकाम थोडे राहिले आहे ते सुद्धा अगदी सुंदर करावे, विद्यार्थ्याला डिजिटल वर्ग द्यावे म्हणून त्यांची धडपड सुरू झाली,त्यांनी सुद्धा अनेक व्यक्तींशी संपर्क केला असता स्वतः लक्ष देऊन एक - गोष्ट लक्षात घेऊन इमारत बांधकाम करण्यास सुरुवात केली,सी आकाराची इमारत आज प्राथमिक ची संपूर्ण तालुक्यांमध्ये एकच असेल असे म्हनण्यास हरकत नाही. त्यांची धडपड जिद्द इतकी असते की काम सुंदर झाले पाहिजे, विद्यार्थ्यांना व पालकांना इमारत आवडली पाहिजे,विद्यार्थ्यांना कुठला त्रास होता कामा नये या गोष्टीचा विचार करून प्रत्येक पायरी -पायरी कशी असली पाहिजे याचा विचार ते करत असतात,स्नेहसंमेलने ,सहली यामध्ये शिक्षक विद्यार्थी सुखकर असला पाहिजे ही धडपड त्यांची नेहमीच मला दिसली आहे. आता बांधकाम खूप झाले असे सर्वजण म्हणु लागले परंतु अतिशय उत्कृष्ट इमारत करूनच आपण थांबायचं हा संकल्प धरून त्यांनी मनात निश्चय केला, संस्थाचालक असून सुद्धा शिक्षकांमध्ये मिळून-मिसळून राहून त्यांना प्रेरणा देऊन, कार्य कसे करावे ,शिक्षक म्हणून कसे जगावे, जीवनामध्ये ध्येय कसे ठेवावे, असे वेळोवेळी मार्गदर्शन करून, सगळ्यांनाच पुढे घेऊन जाण्याचे त्यांचे हे गुण अगदी वाखाणण्याजोगी आहे, निवृत्त शिक्षक असून सुद्धा कार्यरत असलेल्या शिक्षकां पेक्षा दुप्पट जिद्द धडपड आणि कार्य करण्याची उमेद त्यांच्यामध्ये दिसते. सर्व शिक्षकांना आम्हाला दिसून येते, वेळेचे अगदी पाबंदी आहेत. सर, एखादा प्रोग्राम असला की एकदा ...दोनदा ...तीनदा.... त्याची तालीम घेतात, शिक्षकांना प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन करतात....
म्हणूनच की काय मराठवाड्यामधील उत्कृष्ट शाळा म्हणून परभणी एथील म.श.शिवणकर प्रतिष्ठान परभणी... यांच्यातर्फे उत्कृष्ट संस्था व नियोजन म्हणून विद्यालयाला प्रथम पारितोषिक प्रमाणपत्र व 51 हजार रुपयाचे बक्षीस मिळाले.
सर्व गोष्टी एकीकडे आणि कळस एकीकडे असते. आमच्या विद्यालयाच्या बांधकामाचा कळस, गुणवत्तेचा कळस वाढण्यामागे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री उमाकांत राव बुधे हे आहेत. असे मला प्रांजळपणे सांगावेसे वाटते.
सर्व व्यक्तींना एक प्रेरणास्थान आवश्यक असते.हेच कार्य करण्याचे माझे प्रेरणास्थान म्हणून मला आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमाकांत बुधे यांना म्हणावेसे वाटते.
सौ. मंजुषा कुलकर्णी.
सरदार वल्लभभाई पटेल प्रा.
विद्यालय उदगीर.