बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता

बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला


माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता


उदगीर (विक्रम हलकीकर): अनेक दिवसांपासून उपाशी राहिल्याने रस्ताच्या कडेला बेवारशी इसम पडल्याची माहिती मिळताच उदगीर येथील माजी नगरसेवक अहमद सरवर तत्परतेने घटनास्थळी दाखल होऊन संबंधित इसमावर वेळेवर योग्य उपचार झाल्याने त्या इसमाचे प्राण वाचले आहेत. सरवर यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल समाजातून त्यांचा गौरव केला जात आहे.


दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उदगीर पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांनी उदगीरचे माजी नगरसेवक अहमद सरवर यांना दूरध्वनीवरून डोंगरशेळकी तांडा येथे जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक अनोळखी इसम रस्त्याच्या कडेला पडला असल्याचा निरोप दिला. हा निरोप मिळताच अहमद सरवर यांनी त्वरित मिर्झा पाशा बेग व अन्वर शेख यांच्यासह अभिषेक बरुरे रेड्डी, राहुल पुडं आणि इतर तांडा समाजाच्या साह्याने त्वरित ॲम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोचले. त्याठिकाणी गेल्यावर ही व्यक्ती दोन दिवसापासून याच ठिकाणी असल्याचे समजले. श्वास चालू होता मात्र ती व्यक्ती काहीच बोलत नव्हती. आजूबाजूने जाणाऱ्या व्यक्तींनी तो झोपला असेल असे समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आले. त्याची परिस्थिती पाहता त्याला ताबडतोब वैद्यकीय सेवेची गरज आहे ते लक्षात येताच अहमद सरवर यांनी त्वरित उदगीरचा सरकारी दवाखाना गाठले. त्यांनतर सोशल मीडियावर अनोळखी इसम बेवारस पडलेली असल्याची माहिती दिली. अनेकांनी चौकशी सुरू केली. काही वेळात संबंधित व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्या इसमाच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. दरम्यानच्या काळात त्वरित सरकारी दवाखान्यात दाखल करून त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांनी देखील तत्परता दाखविली असल्याचे अहमद सरवर यांनी सांगितले. 


सलग चार-पाच तासाच्या उपचारानंतर पेशंट चांगल्या स्थितीत आला, परंतु त्यांना अत्यावश्यक सेवेची गरज असल्यामुळे उदगीरच्या सरकारी दवाखान्यांमध्ये ICU उपलब्ध नसल्यामुळे त्यांना लातूरला हलविण्यात आले असून पुढील उपचार हे लातूर येथील शासकीय दवाखान्यांत चालू झाले.


माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी दाखविलेली तत्परता व सोशल मीडियामुळे नागरिकांकडून झालेली मदत यामुळे एक इसमाचा जीव वाचविण्यात आला असून सरवर यांच्या तत्परतेचे समाजातून कौतुक होत आहे.


डॉक्टरांनी वेळेवर उपचार केल्यामुळे आपण सदरील इसमाचा जीव वाचवू शकलो असल्याची भावना माजी नगरसेवक अहमद सरवर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.


Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image