केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून निलंगेकर परिवाराचे सांत्वन

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून निलंगेकर परिवाराचे सांत्वन


निलंगा : माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ५ ऑगस्ट रोजी निधन झाले. लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निलंगा येथील अशोक बंगला येथे निलंगेकर परिवाराची भेट घेऊन अशोकराव पाटील निलंगेकर, विजयकुमार पाटील निलंगेकर, संभाजीराव पाटील निलंगेकर, अरविंद पाटील निलंगेकर आदी निलंगेकर परिवारातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.


डॉ. निलंगेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी विधानसभेत काम करीत असतानाच्या डॉ. निलंगेकर साहेबांच्या आठवणींना उजाळा देत डॉ. निलंगेकर यांनी मुख्यमंत्री पदासह अनेक खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. त्या दरम्यान त्यांनी आमदार कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार न करता त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम तात्काळ मार्गी लावत असत. विकासाची दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जायचे असे दानवे यावेळी म्हणाले. यावेळी दानवे यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज