राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग प्रदेश चिटणीस उस्मान मोमीन यांचा सत्कार संपन्न
उदगीर [ प्रतिनिधी ] लातूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य, जळकोट नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक उस्मानअलीसाहब मोमीन यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी यांच्या संपर्क कार्यालय येथे करण्यात आला. या वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड दीपालीताई औटे होत्या. या वेळी शफी हाशमी, पाशा पटेल, शेख मौला, रा. काँ. पा. सामाजिक न्याय विभाग तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, कार्याध्यक्ष रंजीत भांगे, अभिजीत औटे, बाळू सगर, अझरोद्वीन शेख, सोनू हाशमी, शालीवान सोनकांबळे, समाधान सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी, संजय बोरगावे, गफार पटेल, रज्जाक तांबोळी, रोशन पठाण, सलीम शेख, बबन कांबळे फाजील पठाण, सुलतान खान, जुनैद शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा